Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील !

 








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

मुंबई :  . राज्यााचे  गृहमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील असतील. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे महाराष्ट्राच्या गृहविभागाचा कारभार सोपवण्यात आला आहे. १९९० ला दिलीप वळसे पाटील हे पहिल्यांदाच काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते, यानंतर सात वेळेस ते आंबेगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले, म्हणून आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपद मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यात येत आहे. 

अनिल देशमुख यांनी सकाळी राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या गृह मंत्री पदासाठी अजित दादा पवार , जयंत पाटील आदिची नावे स्पर्धेत होते . तथापि दिलीप वळसे पाटील यांची राज्याच्या गृहमंत्रीपदी निवड करण्यात येईल, असा सकाळ पासूनच्या घडमोडी वर अंदाज वर्तविला जात होता , या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. दिलीप वळसे पाटील यापूर्वी देखील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्री होते, दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या विश्वासू व्यक्तींपैकी एक मानले जातात.

शंभर कोटी रूपयांच्या वसुलीचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांच्याकडून झाला, यानंतर परमबीर सिंह हे कोर्टात गेले आणि हायकोर्टाने जेव्हा अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले, तेव्हा अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला.  दरम्यान गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे.त्यामुळे आता या पदी दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या