Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोनाचा ‘प्रकोप’ सुरु असतानाही बीड जिल्हा झाला ‘ अनलॉक’

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांचा नवा आदेश ..



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

   बीड : -  बीड जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रकोप लक्षात घेता कोरोनाला थोपवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 10 दिवसांचे लॉकडाऊन लावले होते. मात्र या दहा दिवसांत किंचितही कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आले नाही. उलट बीड जिल्ह्यात सरासरी 400 ते 450 च्या घरात दररोज कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. यावरून लॉकडाऊन पुढे वाढणारच आशा चर्चा बीडकरांमध्ये रंगू लागल्या होत्या. मात्र उद्या पासून बीड जिल्ह्याचे लॉक उघडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आहेत.

यामुळे आता सार्वजनिक वाहतुकीसह चहाची दुकाने, टपऱ्या उघडता येणार असल्या तरी हॉटेल, रेस्टोरंट, मॉल, सार्वजनिक ठिकाणे बंदच राहणार आहेत. केवळ दहावी आणि बारावीच्या खाजगी क्लासेसला ५० % क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे. आता सकाळी ७ ते सायंकाळी ८ यावेळेत बऱ्यापैकी व्यवहार सुरु ठेवता येणार आहेत. मात्र हॉटेल, रेस्टोरंट, मॉल, सिनेमागृहे, सार्वजनिक बगीचा आदी ठिकाणे बंदच राहणार आहेत. हॉटेल बंदी मधून चहा विकणाऱ्या छोट्या टपऱ्यांना वगळण्यात आले आहे, मात्र त्यांनी मास्क नसलेल्या ग्राहकांना चहा देऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. हॉटेल बंद करण्यात आल्या. तरी सकाळी ७ ते सायंकाळी ८ यावेळेत त्या सुविधा देऊ शकणार आहेत. तर रात्रीच्यावेळी जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून त्याचे उल्लंघन केल्यास १ हजार देण्यात आले आहेत.

हॉटेल बंद करण्यात आल्या असल्या तरी सकाळी ७ ते सायंकाळी ८ यावेळेत त्या पार्सल सुविधा देऊ शकणार आहेत. जिल्ह्यात रात्रीच्यावेळी जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून त्याचे उल्लंघन केल्यास १ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. विवाहासाठी ५० लोकांची परवानगी पण विवाहासाठी ५० लोकांची परवानगी देण्यात आली आहे, मात्र त्यासाठी अगोदर स्थानिक पोलीस निरीक्षकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच विवाहास उपस्थित राहणार्या ५० व्यक्तींची यादी आणि त्या प्रत्येकाचे कोरोना तपासणी केल्याचे अहवाल सोबत ठेवावे लागणार आहेत.वैद्यनाथ आणि योगेश्वरी मंदिर उघडणार जिल्ह्यातील योगेश्वरी आणि वैद्यनाथ मंदिर सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत हि मंदिरे खुली राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या