लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
खरवंडी कासार - कोरोनाचे संकट भारतामधील सर्व राज्यामध्ये आहे सर्वसामान्य जनता आरोग्य सेवा मिळत नसल्याने तडफडून मरत आहे, हे संकट उपटून टाकण्यासाठी गांवागांवात कोरानाच्या लसी चे लसिकरण केंद्र सुरु करावीत व गाव तेथे लसिकरण केंद्र सुरू करण्यात यावे , अशी मागणी ढाकणवाडीच्या सरपंच सौ . सुरेखा ढाकणे यांनी केली आहे कोरोना महामारी शहरी भागापेक्षा ग्रामीण खुप झपाटयाने वाढत आसुन याला आळा घालण्या साठी गाव तेथे लसीकरण केद्र सुरु यावे, यासाठी शासनाने प्रत्येक गांव स्तरावर शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी,आशा वर्कर्स, ग्रामपंचायत कर्मचारी यांची तात्काळ नेमणूक करत घरोघरी जावुन जनजागृती करत लसीकरण करावे, यामुळे कोरोना मुळे होणारी माणुस हानी होणार नाही, मागिल काळात ही शासनाने नियोजन करत घराघरात जावुन लसिकरण केले आहे, देशाला संकटातून वाचवले आहे,लसिकरणाचे नियोजन करुन या महामारीला हारवणे अत्यंत गरजेचे आहे,तरी या मागणीची प्रशासनानी गाभीर्यानी विचार करुन हा उपक्रम हाती घ्यावा या मुळे कोरोनाचा वाढता संसर्ग कमी होण्यास मदत होईल त्या मुळे गाव तेथे लसीकरण केद्र चालु करावे अशी मागणी केली आहे
0 टिप्पण्या