नवी
दिल्ली :-परीक्षा अचानक
येत नाही आणि जे अचानक येत नाही त्याची भीती कशाला बाळगायची? आणि भीती तुम्हाला परीक्षेची नसतेच, भीती असते ती
या भावनेची की परीक्षाच सर्व काही आहे आणि याला कारणीभूत आपल्या आजूबाजूची मंडळी
असतात. म्हणूनच पालकांनी हे ध्यानात घ्या की परीक्षा हेच आयुष्य नव्हे, तो आयुष्यातला एक लहान टप्पा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण
देऊ नका, अशा शब्दातपंतप्रधानांनरेंद्र मोदीयांनी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाची सुरुवात करत विद्यार्थ्यांना
धीर दिला.
परीक्षा ही जीवन घडवण्याची एक संधी
परीक्षा म्हणजे आयुष्याचा अंत नव्हे, ती आयुष्य घडवण्याची एक संधी असते. तिला एक कसोटी म्हणू पाहायला हवे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.
ऊर्जेचे प्रत्येक विषयासाठी समसमान वाटप करा
जे आवडते ते आपण आधी करतो, विद्यार्थी सहज, सोप्या आणि त्यांना आवडणाऱ्या विषयाचा जास्त अभ्यास करतात आणि कठिण
विषयाला घाबरतात. उलट कठीण असतं त्याला आधी सामोरे जा. परीक्षेत असं म्हटलं जातं
की सोपं आधी सोडवा, पण मी तर म्हणेन जे कठीण आहे त्याचा निपटारा
सर्वात आधी करायला हवा. रिकामा वेळ हवाच
एका विद्यार्थ्याने पंतप्रधानांना रिकाम्या वेळी काय करायचं असा
प्रश्न विचारला. मोदी म्हणाले, 'रिकामा वेळ
मिळणं ही पर्वणीच. रिकाम्या वेळेचा तुम्ही कसा सदुपयोग करता हे महत्त्वाचं. अभ्यास
करून कंटाळा आला की थोडा विरंगुळा हवाच. पण असं व्हायला नको की रिकाम्या वेळी
तुम्ही असा काही वेळकाढूपणा कराल की सगळा वेळ कसा गेला हे कळणारच नाही. रिकाम्या
वेळी तुमच्या आवडीचं काम करा. असं काहीतरी करा ज्यातून तुम्हाला ऊर्जा मिळेल.
क्रिएटिव्हिटीद्वारे तुम्ही स्वत:ला व्यक्त होण्याची संधी द्या.'
0 टिप्पण्या