Ticker

6/Breaking/ticker-posts

लग्नसमारंभात गर्दी झाल्यास तलाठी व ग्रामसेवकांवर कारवाई

 













लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

गडचिरोली :-सध्या गडचिरोली जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आतापर्यंत १८५ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेषत: ग्रामीण भागात लग्न समारंभांमध्ये गर्दी करण्याचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून येत आहे. हे चित्र कायम राहिल्यास ग्रामीण भागात करोना मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी महत्त्वाचे आदेश काढले आहेत. लग्नसमारंभासाठी निश्चित संख्येपेक्षा अधिक लोक आढळल्यास वधुवरांच्या कुटुंबीयांबरोबरच संबंधित गावचे तलाठी व ग्रामसेवकांवरही कारवाई होणार आहे.

ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण संख्या वाढत असल्याने नव्या करोना निर्बंधांनुसार, लग्न समारंभामध्ये जास्तीत जास्त २५ लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. याचे उल्लंघन केल्यास संबंधित वर-वधु, त्यांचे आईवडील, मंगल कार्यालय/लॉन/सभागृह मालक, कॅटरर्स यांचेवर नियमाप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. तसेच संबंधित गावाचे तलाठी व ग्रामसेवकांवरनिलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

एप्रिल मधील ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता जिल्ह्यात कोरोना संसर्ग अधिक गतीने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला विविध ग्रामीण कार्यक्रमातील गर्दी कमी करणेबाबत व नियमानुसार कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याबाबत या अगोदरच सूचना करण्यात आले आहेत. त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी कडक स्वरूपात करणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या