लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगर - नगर तालुक्यातील सांडवे गावचे भूमिपुत्र व केडगाव येथील सुनील गोपीनाथ वायकर यांचे वयाच्या ४3 व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
शहरातील गिगाबाईट काँम्प्युटर इंटरनेट कॅफे अँण्ड शाँपी, आनंदी बाजार कॉर्नर ,पटवर्धन चौक,अ.नगर या संस्थेचे ते मालक होते. शासकीय विद्या निकेतन चे माजी विद्यार्थी व सरस्वती एज्युकेशन सोसायटी गिगाबाईट काँम्प्युटर व उदयनराजे काँम्प्युटर टायपिंग केडगावचे संस्थापक प्रवर्तक बाबासाहेब वायकर यांचे ते छोटे बंधू होते. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगी व भाऊ भावजय पुतणे असा परिवार आहे.
वेळेवर इंजेक्शन व ऑक्सिजन न मिळाल्यामुळे , कोविड रूग्णाच्या वैद्यकीय सेवा करिता M D. Doctor अभावी, त्यांना आपला जीव गमवावा लागला. या बाबत केडगाव मधील हॉस्पिटल मधील सेवेबाबत बाबासाहेब वायकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.कै. सुनील वायकर यांच्या अचानक जाण्याने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या