लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
बीड : -कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने कडक लॉकडाऊन लावला आहे. या लॉकडाऊनचा आजचा पहिला दिवस, दरम्यान बीड मध्ये पहिल्याच दिवशी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून काठ्यांचा प्रसाद दिला गेलाय. सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक आस्थापना खुल्या करण्यास परवानगी आहे. माञ ही वेळ संपल्यानंतर पोलीस ऍक्शन मोड मध्ये आलंय.
शहरात ठिक ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी असून बाहेर पडलेल्या नागरिकांची चौकशी केली जातेय. यावेळी हौशीना चांगलाच प्रसाद दिला गेलाय. एकीकडे कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. तर नागरिकांची रस्त्यावरील गर्दी कमी होण्याचं नाव घेत नाहीय. शहरातील बशीरगंज, सुभाष रोड, माळवेस याठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला असून यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जातेय. पोलिसांच्या या कारवाईने रस्त्यावरील नागरिकांची गर्दी कमी झालीय.
0 टिप्पण्या