मनसे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांची मागणी
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
यावेळी अधिक माहिती देताना मनसेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनी सांगितले की पाथर्डी शहर हद्दीमध्ये सध्या कोरोना साथरोगाचा अागडोंब ऊसळलेला असुन चाचणी मध्ये दररोज ७०-८० कोरोना पाॅझीटीव्ह रुग्न सापडले जात अाहेत तर दररोज दोन तीन रुग्ण मृत्युमुखी पडलेल्यांची खबर कानावर येत आहे,जेवढे रुग्ण चाचणी मध्ये सापडले जात अाहेत त्यापेक्षाही कैक पटीने जास्त चाचणी न केलेले कोरोना पाॅझीटीव्ह रस्त्यावर फिरत अाहेत त्यामुळे येत्या काळात पाथर्डी शहरामध्ये कोरोना पाॅझीटीव्ह रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता आहे.जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या वतीने पाथर्डी शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार केंद्र सुरू असून व ईतर तीन ठीकाणी रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे परंतु तेथेही अपुरी सुविधा व ऊपलब्ध बेड,जागेच्या अभावी कोरोना बाधीतांची हेळसांड होते अाहे.
नगर जिल्ह्यातील संगमनेर,श्रीरामपूर,कोपरगांव अादींसह अनेक ठिकाणी त्या - त्या नगरपरिषदेच्या वतीने कायमस्वरूपी अारोग्यसेवा पुरवली जात असताना पाथर्डी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नागरीकांसाठी अशा प्रकारची अारोग्यसेवा का देण्यात येत नाही..?शहरातील नागरीकांसाठी रास्त दरात अाधुनिक अारोग्यसेवा देणे हे नगरपरिषदेचे कर्तव्य नाही काय..? फक्त पाणीपुरवठा व स्वच्छता एवढीच कामे नगरपरिषदेची अाहेत काय..? असा प्रश्न उपस्थित करुन जिरेसाळ यांनी पुढे सांगितले की कोरोना प्रतिबंधासाठी मास्क वापरने, साेशल डीस्टसींग व लाॅकडाऊन या तात्पुरत्या उपाययोजना अाहेत,कोरोना साथरोगाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे हेच प्रभावी हत्यार अाहे,
सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण हे सुद्धा उपजिल्हा रुग्णालय येथेच सुरू असून त्याच ठिकाणी कोरोना पाॅझीटीव्ह रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत,तेथे बिनदिक्कतपणे कोरोना पाॅझीटीव्ह रुग्णांचा वावर सुरू असताना त्याच ठीकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून उपजिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणा मुळे तेथे सगळा सावळा गोंधळ सुरु असुन लसीकरणासाठी गेलेल्या शहरातील नागरीकांना तेथे तासनतास ताटकळत बसावे लागत आहे,याकामी शहर हद्दीतील नागरीकांसाठी नगरपरिषद प्रशासनाने पुढाकार घेऊन शहरात किमान पाच ठीकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करणे आवश्यक आहे,याकामी नगरपरिषद प्रशासनाने अावाहन केल्यास अनेक डाॅक्टर्स,केमिस्ट संघटना,सामाजिक संस्था,समाज मंदिर,मंगल कार्यालय नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करतील.
कोरोना अत्यवस्थ रुग्णांसाठी शहर नव्हे तर तालुका भरात कोठेही अाॅक्सीजन,व्हेंटिलेटर याची सुविधा उपलब्ध नाही व अागामी काळात नागरीकांचा जीव वाचवण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने नागरीकांच्या अारोग्याची जबाबदारी हाती घेऊन कोवीड रुग्णांसाठी सर्व सुविधा युक्त कोवीड सेंटर व कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करावे अन्यथा शहरातील कोरोना पाॅझीटीव्ह नागरीकांच्या मृत्युस नगरपरिषद प्रशासनाला जबाबदार धरण्यात येऊन नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचा लढा उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला,यानंतर मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी मा.ऊपजिल्हाधिकारी,मा.तहसीलदार,मा.तालुका अारोग्य अधिकारी व मा.जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत वरील विषयासाठी मंजुरी मिळवून या संदर्भात नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेऊन शहरातील नागरीकांच्या अारोग्याची काळजी घेतली जाईल असे अाश्वासन दिले.
यावेळी मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे,शहर सचिव संदिप काकडे,प्र.शहराध्यक्ष सुभाष घोरपडे,ऊपशहर अध्यक्ष सोमनाथ फासे,राजु गिरी,विद्यार्थी सेनेचे शहर सचिव प्रथमेश नाकील,अजित चौनापुरे,नगरपरिषद कार्यालय अधिक्षक अय्युब सय्यद,अतिक्रमन विभाग प्रमुख सोमनाथ गर्जे,स्वच्छता निरिक्षक दत्ता ढवळे अादी उपस्थित होते..
0 टिप्पण्या