लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
)
संगमनेर:- महामार्गावर
अपघात झाल्यावर मदतीपेक्षा लुटालूट करण्यावरच नागरिकांचा जास्त भर असतो. त्यामुळे
कधी तेलाच डबे, कधी दारूच्या
बाटल्या तर कधी पेट्रोल-डिझेल घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते. पुणे-नाशिक
महामार्गावर संगमनेर तालुक्यात कोंबडीची पिल्ले घेऊन जाणारा पिकअप टेम्पो उलटला आणि तेथेही पिल्ले घेऊन जाण्यासाठीच नागरिक धावले.
टेम्पो चालक पुणे येथून बाॅक्समध्ये कोंबडीची पिल्ले घेवून
शनिवारी पहाटे पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गाने संगमनेरकडे जात होता. गुजांळवाडी
शिवारात चालकाने नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या दुभाजकाला धडकून टेम्पो उलटला.
अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला. महामार्गावर कोंबड्यांची पिल्ले पाहून काही
वाहनचालकांनी गर्दी केली.
अपघात झाल्याची माहिती समजताच डोळासणे महामार्ग
पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, साईनाथ दिवटे, रमेश शिंदे, मनेष शिंदे, अरविंद गिरी, योगीराज सोणवने यांनी घटनास्थळी
धाव घेतली त्यानंतर अपघातग्रस्त वाहन टोल नाक्यावरील क्रेनच्या मदतीने बाजूला घेऊन
महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
0 टिप्पण्या