जिल्ह्यातील मृत करोना रुग्णांचे अंतिम संस्कार तातडीने करण्याची केली मागणी
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
)
चिचोंडी पाटील :-जिल्हा रुग्णालयासह खासगी
रुग्णालयांमध्ये मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील करोना रुग्णांचे अंतिम संस्कार
थांबवल्यामुळे मृतांच्या नातेवाइकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नगर शहराबाहेरील
मृत करोना ग्रस्तांचे अंतिम संस्कार तातडीने करून मरणानंतरही होणारी छळवणूक
थांबवावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य
संदेश कार्ले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ईमेल द्वारे केली आहे
ग्रामीण भागातील शेंडी,भातोडी, रस्तापुर अशा
जिल्ह्यातील अनेक ठिकाणावरून मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचे याबाबत
तक्रारी आल्या. कोविड ग्रस्त मृतांच्या नातेवाईकांना बेड मिळवणे, बिल भरणे, अशा अनेक अवघड
बाबी मानसिक तणावात पार पाडाव्या लागतात. दुर्दैवाने रुग्णाच्या मृत्यूनंतरही
त्याच्या नातेवाईकांना मोठा मानसिक धक्क्यातून सावरत हे सर्व सोपस्कार पार पाडावे
लागतात. नातेवाईकांचे असे अतोनात होणारे हाल मानवतेला काळिमा फासणारे आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत सीना नदी पात्रात अंतिम संस्कार केले तरी चालेल. त्या भागात
थोडेफार प्रदूषण होइल. अंतीमसंस्कार सुरू ठेवूनही
प्रदुषण नियंत्रण आणण्यासाठी उपाय योजना करता येईल. नगर
शहराबाहेरील मृतांचे अंतिमसंस्कार थांबवणे ही अतिशय घृणास्पद घटना आहे.
प्रशासनाने खंबीरपणे भूमिका घेऊन निर्णय
घ्यावेत व मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची व त्या व्यक्तीची मरणानंतर
सुटका करावी अशी मागणी संदेश कार्ले यांनी केली आहे.
0 टिप्पण्या