मुंबई- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील आरोपांची अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी १५ दिवसात सीबीआयनं पूर्ण करावी, असा निर्णय कोर्टान दिला आहे. त्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याची माहिती हाती आली आहे.
सीबीआय चौकशीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वेगाने राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात बैठक सुरु आहे . या बैठकीत अनिल देशमुख यांच्याबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. यावेळी अनिल देशमुख यांची सीबीआयकडून चौकशी झाली तर सरकारची नाचक्की होऊ शकते,यासाठी त्यांच्याकडून राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे .
दरम्यान गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचे प्रकरण भाजपने लावून धरले आहे.
दरम्यान गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचे प्रकरण भाजपने लावून धरले आहे.
त्यात आता अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची सीबीआयने प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने गृहमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या आहेत . मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला अटक झाली . यानंतर परमबीर सिंग यांची मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती . गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी खंडणी वसूली करण्याचे आदेश दिले होते , असा दावा करणारे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. या पत्राने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती .
0 टिप्पण्या