Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोणा नियम मोडणाऱ्यावर खरवंडी येथे प्रशासनाची कारवाई

 नियम मोडणाऱ्या दुकानदाराचे दुकान सिल करण्याचे गटविकास अधिकाऱ्याचे आदेश 








लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार :-पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे कोरोणा नियम मोडणाऱ्यावर पंचायत समिती पोलीस व  महसूल व ग्रामपंचायत अशा संयुक्त पथकाने दंडात्मक कारवाई करण्यात आली 

कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोवीड १९ च्या गाईडलाईननुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय लाॅकडाउन २ मधे घेतला असल्याने नियमाचे उल्लंघन करणांवर व विना मास्क शोशल डीस्टसिंगचे पालन न करणारांवर कारवाईचा बडगा प्रशासनाने उचलला आहे

         पाथर्डी  तालुक्यातील खरवंडी कासार येथे एका महीण्यात सात  व्यक्तीचा मृत्यू झाल्या आहेत  ,कोरोणारूग्ण  वाढत आहे येथिल आरोग्य केदांमध्ये तपासणी किट नसल्याने रुग्ण  संख्या किती आहे कळत नाही त्रास होत असतानाही  ग्रामस्थ तपासणीच करत नाहीत  व ते गावात राजरोस पणे वावर करत आहेत त्यामुळे कोरोणा चा फैलाव होत आहे यापुर्वी गावात दोन दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत मोफत कोरोणा  तपासणी कँप लावला होता    फक्त ६२ ग्रामस्थांनी तपासणी केली त्यामध्ये १२ व्यक्ती पॉझीटिव्ह निघाल्या होत्या नतंर तपासणी किट सपंल्याने तपासणी बदं झाली  ग्रामस्थ  जास्त त्रास झाल्यावर उपचारासाठी रूग्णालयात दाखल होतात , कोरोणामुळे खरवंडी कासार येथील वाढती मृत्यू संख्या आलेख पाहता परिस्थिती अतीशय गंभीर आहे 

       खरवंडी कासार येथे अशा महामारीत व्यावसायीक वर्ग दुकाण बंद करूण दारासमोर बसून ग्राहकसेवा करत आहे पैशाच्या हव्यासापायी कोरोणाला आमंत्रन देत रुग्ण  संख्या वाढवत आहेत.

पाथर्डी च्या गटविकास अधिकारी शितल खिडे पशुधन विकास अधिकारी जगदिश पालवे विस्तार अधीकारी प्रशांत तोरवणे यांनी आज महसुल व  पंचायत समिती चे कर्मचारी पोलीस कर्मचारी   ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी, कोरोना दक्षता कमिटी यांना बरोबर घेत   विनामास्क फिरणाऱ्यावर व दंडात्मक कारवाई केली. मात्र त्यांना काही बहादरानी  उर्मट भाषा वापरली .

तर .. दुकाने सील करावे लागतील

नियम मोडणाऱ्या दुकानदाराना यापुर्वी तोंडी सुचना दिल्या दंड ही केला तरी जर दुकानदार जर कोरोना चे घालुन दिलेले नियम मोडत असतिल तर  दुकान सिल करावे  असे आदेश   गटविकास अधिकारी शितल खिडे यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यानां दिले  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या