*रूग्णाच्या मृत्यूनंतर झाला पर्दाफाश.
*"तो" डॉक्टर अवघा आठवी पास
*शिरूर तालुक्यात एकच खळबळ
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शिरूर : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे असलेले मोरया हॉस्पिटलचे डॉक्टर बोगस असल्याची तक्रार रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली असून, संबंधित डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.
मोरया हॉस्पिटलच्या बोगस डॉक्टर विरोधात कर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. उज्वल शशिकांत बाभुळगावकर यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
डॉ. उज्वला शशिकांत बाभुळगावकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर यांनी दुपारी फोनवरून कळविले की, कारेगाव (ता, शिरूर) येथील मोरया हॉस्पिटल हे बोगस असल्याची माहिती मिळाली असून, त्या ठिकाणी जाऊन खात्री करा असे सांगितले. त्यानुसार मोरया हॉस्पिटल येथे जाऊन खात्रील केली असता सदर हॉस्पिटलचे डॉक्टर मेहमुद फारुख शेख (रा. पिर बुऱहाणपूर, ता. जि. नांदेड) यांनी महेश पाटील असे खोटे नाव धारण करून रजि. नं. 2015/06/3804 या रजिष्ट्रेशन नंबरचा वापर करून महेश पाटील यांचे वैद्यकिय पदवीच्या सर्टिफिकिटवर स्वतःचा फोटो लावून बनावट सर्टिफिकीट तयार करून मोरया नावाचे हॉस्पिटल चालवून त्यामध्ये कोविड सेंटर चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे.
डॉक्टर मेहमुद फारुख शेख या नावाने डॉक्टर डिग्री व रजिष्ट्रेशनचे प्रमाणपत्राचे नोंदणी केलेली नसताना तसेच त्यास वैद्यकीय क्षेत्रामधील कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसताना तो सदर हॉस्पिटल चालवित आहे. मेहमुद शेख याची प्रमाणपत्रे शासन निर्णयानुसार गाह्य नाहीत व मुंबई नर्सिंग होम ऍक्ट अंतर्गत हॉस्पिटल नोंदणी नसल्याने त्याने महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम 1961 चे कलम 33(2) नुसार अपराध केला आहे, अशी तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, मोरया हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टर असल्याचे समजल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मेहमुद फारुख शेख याला अटक केली असून, याठिकाणी उपचार घेत असलेले कोरोनाचे २२ रूग्ण इतरत्र हलविण्यात आले आहेत. या मुन्नाभाई डॉक्टरचे शिक्षण अवघे आठवी पास असून कारेगाव येथे तो गेल्या दोन वर्षांपासून आयसीयू हॉस्पिटल चालवत होता. कोरोनाच्या काळात त्याने लाखो रूपयांची कमाई केल्याचेही समजते. दरम्यान आज सकाळी एका कोरोना रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर हे बोगस हॉस्पिटलचा पर्दाफाश झाला. मयत रूग्णाच्या नातेवाईकांनी या डॉक्टरची मात्र चांगलीच धुलाई केली.
0 टिप्पण्या