Ticker

6/Breaking/ticker-posts

परिचारिकेनेच चोरले रेमडेसिवीर इंजेक्शन; चोरांच्या टोळीचा पर्दाफाश..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

गडचिरोली: राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असतानाच गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथून १२ रेमडेसिवीर इंजेक्शन चोरीस गेल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सामान्य रुग्णालयातीलपल्लवी मेश्राम (३५) या परिचारिकेस नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

नागपूर येथे बेलतरोडी पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. शुक्रवारी सायंकाळी बेलतरोडी पोलिसांनी रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या टोळीतील मनोज वामनराव कांबळे (वय ४०, रा. जुनी शुक्रवारी),  अतुल वाळके (वय ३६, रा. आयुर्वेदिक ले आऊट ), पृथ्वीराज देवेंद्र मुळीक (वय ३६, रा. रहाटे कॉलनी), अनिल वल्लभदास काकानी (वय ५२, रा. टेलिफोन एक्स्चेंज चौक) आणि अश्विन देवेंद्र शर्मा (वय ३२, रा. गावंडे ले आऊट नरेंद्र नगर नागपूर) यांना जेरबंद केले होते. या टोळीकडून ७ रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी आपला हिसका दाखवताच एक आरोपी अतुल भीमराव वाडके याने धक्कादायक माहिती देत परिचारिका पल्लवी मेश्रामचे नाव घेतले. पल्लवी मेश्रामने दोन आठवड्यांपूर्वी ही इंजेक्शन चोरून नागपूरच्या काळा बाजारात विकली होती, असेही त्यातून स्पष्ट झाले.

गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत परिचारिका पल्लवी मेश्राम ही अतुल वाडके याची मेव्हणी आहे. गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात ती मागील आठ वर्षांपासून कार्यरत आहे. तिने इंजेक्शन चोरून वाडके याला दिल्याचे आरोपीने सांगितले. त्यानुसार नागपूर पोलिसांनी तिला अटक केली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय अनभिज्ञ

पल्लवी मेश्राम ही मागील आठ वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. तिने रेमडेसिवीर चोरल्याबाबत गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनात अनभिज्ञ होते. दुपारपर्यंत तरी याबाबत कोणतीही पोलीस तक्रार केली गेली नाही. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूढे 
यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या