लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
बँकॉक: मास्कचा वापर अनिवार्य केल्यानंतरदेखील मास्क न
वापरल्यामुळे थायलंडचे पंतप्रधान जनरल प्रयुत चान ओ-चा यांना दंड ठोठावण्यात आला.
प्रयुत चान यांच्याकडून सहा हजार बात (१४ हजार२७० रुपये) दंड घेण्यात आला.
थायलंडमध्ये करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू
आहेत.
बँकॉक पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान जनरल प्रयुत हे लस
खरेदी करण्याबाबतच्या बैठकीत उपस्थित होते. मात्र, या बैठकी
दरम्यान त्यांनी मास्क घातला नव्हता. बँकॉकचे गर्व्हनर असाविन क्वानमुआंग यांनी
फेसबुकवर पोस्ट लिहून पंतप्रधानांविरोधात पोलीस तक्रार दाखल केली असल्याचे
सांगितले. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटोही जोडला होता. बैठकीत इतरांनी मास्कचा
वापर केला होता. तर, पंतप्रधानांनी मास्कचा वापर केला
नव्हता. सोशल मीडियावर पंतप्रधानांवर जोरदार टीका सुरू झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी
पावले उचलली.
थायलंडमध्ये एक मेपासून थायलंडचे नागरिक
वगळता भारतीयांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. शनिवारपासून थायलंडच्या सीमा
भारतीयांसाठी बंद होणार आहेत. थायलंडमध्ये सोमवारी करोनाचे २०४८ रुग्ण आढळले. तर, आठजणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.
थायलंडआधी भारतीयांना कॅनडा, ब्रिटन, पाकिस्तान,
संयुक्त अरब अमिराती, बांगलादेश आदी देशांनी
प्रवेश बंदी केली आहे. भारतात वाढत असलेल्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
0 टिप्पण्या