लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नाशिक : तरुणांमध्ये सध्या वाढदिवस वेगळ्या आणि हटके पद्धतीत साजरी करण्याचं वेगळं क्रेझ आहे. त्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करुन आयुष्यातील अविस्मरणीय क्षण बनवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांचा हाच प्रयत्न कधीकधी अंगावर येऊ शकतो. त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्यांच्यापैकी कुणाचा जीवही जाऊ शकतो. या गोष्टीचा प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवस साजरी करण्यासाठी धरणावर गेलेल्या ५ मुली व एका मुलाचा मृत्यु झाला आहे.
या घटनेमुळे पाथर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारण आज सहा
कुटुंबानी त्यांच्या घरातील एक सदस्य गमावला आहे. नाशिकमध्ये
सेल्फी काढणे काही तरुणींना महागात पडलं आहे. सेल्फी काढण्याच्या नादात सहा जणांचा
धरणात पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. मृतांमध्ये 5 मुली तर एका मुलाचा समावेश आहे. सध्या ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने
त्यांचा शोध सुरु आहे. सर्व मृतक तरुण हे शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थींनी
होते. ते नाशिकच्या पाथर्डी येथे वास्तव्यास होते. त्यांच्या ग्रुपमधील एका मुलीचा
आज वाढदिवस होता. त्याच निमित्ताने ते वालदेवी धरण येथे गेले.
या परिसरात त्यांनी वाढदिवसाचा केक कापला, सेलिब्रेशन केलं. मात्र, सेल्फी काढत असताना काही मुली वालदेवी धरणाच्या कडेला उभ्या राहिल्या. यावेळी त्यांचा पाय सटकला आणि पाण्यात तोल गेला. त्यामुळे त्या धरणात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी बाकीच्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाला. आतापर्यंत एका मुलीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आलं आहे. रात्रीची वेळ असल्यामुळे मदत कार्यात मोठा अडथळा निर्माण होतोय.
तरुणांनी आई-वडील आणि कुटुंबाचाही विचार करावा
काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करण्याआधी मुलामुलींनी आधी आपल्या
आई-वडिलांचा जरुर विचार करावा. कारण अशा घटनांमुळे आई-वडिलांची होणारी वाईट अवस्था
शब्दांमधून सांगता येणार नाही. मुलांना जन्मापासून लहानाचं मोठं करणं, त्यांना काय हवं नको ते बघणं, त्यांचे लाड पुरवणं,
त्यांना शिक्षण देऊन नोकरीला लावणं आणि अचानक मुलांनी इशी एक्झिट
घेणं हे कधीच न पचणारं असं आहे. ही जखम कधीच भरुन काढता येणारी असते. त्यामुळे
आई-वडील पूर्णपणे खचतात. काहीजण आजारी पडतात आणि त्याच दु:खात स्वर्गवासी होतात.
त्यामुळे मुलांनी आई-वडील आणि कुटुंबाचाही विचार करावा.
0 टिप्पण्या