Ticker

6/Breaking/ticker-posts

अर्धा मानव-अर्धा रोबोट; वैज्ञानिकाने घातक आजारावर अशी केली मात !

 


लोकनेता न्यूज

  ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

लंडन: ब्रिटनमधील एका वैज्ञानिकाने स्वत:ला मोटर न्यूरॉन नावाचा घातक आजार असतानाही स्वत:ला जगातील पहिल्या रोबोमॅनमध्ये रुपांतरीत केले आहे. या आजारामुळे शरिरातील मांसपेशी नष्ट होण्यास सुरुवात होते. आता मशीनच्या मदतीने सर्व काम सहजपणे करतात. अर्धा मानव आणि अर्धा रोबोट अशी ओळख असणाऱ्या वैज्ञानिकाचे नाव डॉक्टर पीटर स्कॉट-मॉर्गन असून ते ६२ वर्षांचे आहेत.

डॉक्टर पीटर स्कॉट-मॉर्गन इंग्लंडमधील डेवोनमध्ये वास्तव्य करतात. त्यांना मोटर न्यूरॉन नावाचा घातक आजार आहे. हा आजार असल्याचे त्यांना समजताच त्यांनी वैद्यकीय विज्ञानालाच आव्हान देण्याचे धाडस केले. वर्ष २०१७ मध्ये त्यांना मांसपेशी नष्ट करणारा आजार झाल्याचे निदान झाले. या आजारामुळे त्यांचे काही अवयव निकामी होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांना रोबोटिक्सचा वापर करत आजारावर मात करण्याचा प्रयत्न केला.

२०१९ मध्ये स्वत: विकसित केली मशीन

सायबोर्ग या सायन्स फिक्शन कॉमिक पात्रापासून आपल्याला प्रेरणा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. हे कॉमिक पात्रदेखील अर्धा मानव आणि अर्धा रोबोट आहे. माझे अर्धे शरीर हे मशीन असले करी मी पूर्वीप्रमाणे राहत आहे. मागील चार वर्षातील चांगली गोष्ट कोणती आहे, असे कोणी विचारल्यास, मी आतापर्यंत जिवंत आहे, असे सांगेल असेही त्यांनी म्हटले.
डॉ. मॉर्गन यांना अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागेल. रोबोटिस्ट होत असताना त्यांनी जोखीमही स्विकारली. आजारादरम्यान त्यांच्या चेहऱ्याच्या अनेक मांसपेशी नष्ट होऊ लागल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ऑर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या मदतीने बॉडी लँग्वेज सांगणाऱ्या तंत्रज्ञानाची युक्ती वापरली.

डॉ. स्कॉट मॉर्गन केवळ डोळ्यांचा वापर करून अनेक कॉम्प्युटर नियंत्रित करण्यास सक्षम आहेत. त्यासाठी त्यांनी आय-ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. ते सध्या फक्त व्हेंटिलेटरने श्वास घेऊ शकतात. रोबोटमध्ये रुपांतरीत होत असताना त्यांना आपला आवाज गमवावा लागला.

डॉ. मॉर्गन यांनी सांगितले नोव्हेंबर २०१९ मध्येच त्यांनी स्वत:ला अर्धा मानव आणि अर्धा रोबोट म्हणून विकसित करण्याची तयारी सुरू केली होती. त्यानंतर आज फक्त जिवंत नसून सक्रिय देखील असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे आयुष्यातील अनेक वाईट गोष्टी बदलता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या