लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे राज्य
सरकारकडून लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. महाराष्ट्रात काल (1 एप्रिल) एका दिवसात तब्बल तीन लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस
देण्यात आली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
त्यामुळे राज्यातील जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
राज्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून काल एकाच दिवशी 3 लाख नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने उच्चांक गाठला. लसीकरणाला वेग देऊन
यापेक्षा दुप्पट उद्दिष्ट गाठण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे
ट्वीट राजेश टोपे यांनी केले आहे.
मुंबई, पुण्यात रेकॉर्ड ब्रेक लसीकरणाची नोंद
महाराष्ट्रात कालपासून 45 वर्षांवरील
नागरिकांना कोरोना लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. यानुसार काल पहिल्यांदाच 3295
लसीकरण केंद्राच्या माध्यमातून तब्बल 3 लाखांहून
अधिक जणांना लस देण्यात आली. यामुळे राज्यात काल रेकॉर्ड ब्रेक लसीकरणाची नोंद
करण्यात आली. विशेष म्हणजे या लसीकरणात पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे.
पुणे जिल्ह्यात काल एकाच दिवशी तब्बल 57 हजार जणांना कोरोना
लस देण्यात आली.
कोरोना लसीकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
त्यापाठोपाठ मुंबईत देखील 50 हजार जणांचे
लसीकरण करण्यात आले. त्यामुळे कोरोना लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पहिल्या
क्रमांकावर सातत्य राखलं आहे. महाराष्ट्रात देशभरातील सर्वाधिक 65 लाखांहून नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोरोना
प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहीले आहे.
लसीकरणाला वेग देऊन दुप्पट उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग
देण्यात आला आहे. यासाठी दररोज तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट
ठेवण्यात आले आहे. यानुसार सध्या दररोज किमान पावणे तीन लाख नागरिकांना लसीकरण
केले जात आहे. लसीकरणाला वेग देऊन यापेक्षा दुप्पट उद्दिष्ट गाठण्याचा आरोग्य
विभागाचा प्रयत्न आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
0 टिप्पण्या