लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
बीड : बीडमध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे. सर्वसामान्यसह राजकीय नेत्यांनाही कोरोनाचा विळखा बसला आहे. बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांनाही कोरोनाची लक्षण जाणवू लागल्यामुळे . त्यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार प्रीतम मुंडे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यावेळी त्यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले आहे.
मागील आठवड्यात बीड शहरात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक कोविड सेंटरला भेटी दिल्या, डॉक्टर आणि रुग्णांची चर्चा केली.आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. योग्य ते काम करण्यास भाग पाडले आहे. हे काम करून मी 18 तारखेला मुंबईत परतले. असताना अचानक माझी प्रकृती बिघडली आहे.
2 ते 3 दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला आणि प्रचंड अशक्तपणा अशी लक्षणं जाणवायला लागली आहे. आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे, पण रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे, अशी माहिती प्रीतम मुंडे यांनी दिली. तसंच, ‘काही लक्षण आढळल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे,लवकरच आपल्या सेवेत परत रुजू होईल’, असं आश्वासनही प्रीतम मुंडे यांनी दिले आहे.
0 टिप्पण्या