लोकनेता न्यूज ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव :- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भ वलेल्या भयावह परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी काढलेल्या सुधारित आदेशाचे जनतेने तंतोतंत पालन करावे तसेच कोणीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडूच नये, असे आवाहन प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी केले. शेवगाव पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात आज (रविवारी) रूटमार्च काढण्यात आला. त्यावेळी त्यांनी जनतेला हे आवाहन केले.
शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, शेवगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे व विश्वास पावरा पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, गुप्तवार्ता शाखेचे अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, बप्पासाहेब धाकतोडे यांच्यासह शेवगाव पोलीस स्टेशन व नगरपरिषदेचे कर्मचारी या रूटमार्चमध्ये सहभागी झाले होते.
शेवगाव शहरातील क्रांती चौक, मुख्य बाजारपेठ, भगतसिंग चौक, नाईकवाडी मोहल्ला, जैन गल्ली, धनगर गल्ली, आंबेडकर चौक या मुख्य मार्गावरून पोलिसांनी संचलन केले. सध्याचे कोरोना विषाणूचे रौद्ररूप व मृत्यूचे तांडव पाहता जनतेने घराबाहेर पडू नये. स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून केले.
0 टिप्पण्या