Ticker

6/Breaking/ticker-posts

पाच शहरांत लॉकडाऊनचा उच्च न्यायालयाचा आदेश योगी सरकारनं धुडकावला









 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

लखनऊ : गंभीर करोना परिस्थिती उद्भवलेल्या उत्तर प्रदेशातील पाच शहरांत लॉकडाउन करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिले होते. मात्रयोगी आदित्यनाथ सरकारनं उच्च न्यायालयाच्या आदेशावर अंमलबजावणी करण्यास नकार दिला आहे.

करोना संक्रमणाची परिस्थिती ध्यानात घेता उत्तर प्रदेशातील लखनऊ, प्रयागराज, वाराणसी, कानपूर आणि गोरखपूर या शहरांत सोमवारी रात्रीपासून २६ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकारनं हे आदेश धुडकावून लावलेत.

'संपूर्ण लॉकडाऊन' नकोच :

न्यायालयाच्या या आदेशांमुळे लोकांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर परिणाम होईल. जनतेच्या जीवनाचं आणि उपजीविकेचं संरक्षण करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे, त्यामुळे न्यायालयाच्या या आदेशांवर अंमलबजावणी होऊ शकत नाही, असं म्हणत योगी सरकार शहरांत 'संपूर्ण लॉकडाऊन' लावण्यास नकार दिलाय.

राज्यात करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अनेक पावलं उचलण्यात आली आहेत तसंच पुढेही कठोर पावलं उचलण्यात येतील. आयुष्य वाचवण्यासोबत गरीबांच्या उपजीविकेचंही संरक्षण करायचं आहे. त्यामुळे शहरात संपूर्ण लॉकडाऊन लावता येणार नाही, असं

उत्तर प्रदेश सरकारनं म्हटलंय. अनेक ठिकाणी लोक आपल्यावतीनं बंद पाळत असल्याचंही योगी सरकारनं म्हटलंय.

उच्च न्यायालयाचा आदेश

औषधांची विक्री करणारी मेडिकल सोडून किराणा तसंच तीनहून अधिक कर्मचारी असणारी दुकानं २६ एप्रिल २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते. तसंच सर्व मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, रेस्टॉरन्ट, खाद्यपदार्थांची दुकानं २६ एप्रिल पर्यंत बंद राहतील. याशिवाय सर्व धार्मिक स्थळं या दरम्यान बंद राहतील. विवाह सोडून इतर कोणत्याही सामाजिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. हे सुनिश्चित करण्याचे आदेशही न्यायालयानं राज्य सरकारला दिले होते.

'पूर्ण लॉकडाऊन थोपवण्याचा प्रयत्न नाही'

आपल्या या आदेशातून न्यायालयाचा राज्यावर पूर्ण लॉकडाऊन थोपवण्याचा प्रयत्न नाही, असंही अलाहाबाद उच्च न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं होतं. सद्य परिस्थितीत एका आठवड्यासाठीही लोकांना त्यांच्या घरातून बाहेर पडण्यासाठी रोखलं गेलं तर करोना संक्रमणाची साखळी तोडली जाऊ शकते. यामुळे, प्रचंड ताण असलेल्या फ्रंट लाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळू शकेल. यासाठी प्रयागराज, लखनऊ, वाराणसी, कानपूर नगर आणि गोरखपूर शहरांसंबंधी आम्ही काही निर्देश देत आहोत. तत्काळ प्रभावानं यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले जात आहेत, असंही उच्च न्यायालयानं म्हटलं होतं.

राज्यात ९८०० जणांचा मृत्यू

राज्यातील करोना संक्रमणाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता सध्या राज्यात ९१ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात तब्बल ९८०० हून अधिक जणांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

 

 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या