Ticker

6/Breaking/ticker-posts

‘लॉकडाउन’ला पाडव्याचा मुहूर्त आज घोषणा ? मुख्यमंत्र्यांचा रात्री साडेआठ वाजता जनतेशी संवाद..






 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई:- गेल्या  आठवड्या पासून होणार होणार म्हनूण चर्चेत असलेल्या  लॉकडाउनच्या घोषणेला अखेर गुढी पाडव्याचा मुहूर्त मिळाला असून    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडे आठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. महाविकास आघाडी सरकारवर अनेक मंत्र्यांनी लॉकडाउन घोषित होण्याची शक्यता वर्तवली असून आज मुख्यमंत्री ठाकरे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाने ही माहिती दिली आहे.  काही तासांपूर्वीच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी लॉकडाउनच्या संभाव्य घोषणेबाबत भाष्य केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच लॉकडाउनची घोषणा करतील अशी माहिती पालकमंत्री शेख यांनी दिली होती. राज्यात संपूर्ण लॉकडाउन करण्यााबाबतची संपूर्ण तयारी राज्य सरकारने केली असल्याचेही ते म्हणाले होते.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन घोषित केल्यास तो किती दिवसांचा असेल याबाबत देखील लोकांमध्ये उत्सुकता आहे. राज्यात १२ ते १३ दिवसांचा लॉकडाउन लावला जाईल असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. हा लॉकडाउन जाहीर झाल्यास लोकांना दोन दिवसांचा वेळ दिला जाईल असेही म्हटले जात आहे. म्हणजेच लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर तो दोन दिवसांनंतर अंमलात येईल असे सांगितले जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील करोनाच्या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करता येईल याबाबत विविध तज्ज्ञ तसेच सहकारी मंत्र्यांशी विचारविनिमय करत आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी नुकतीच राज्याच्या टास्क फोर्सची बैठक बोलावून राज्यातील परिस्थितीचा आढावा देखील घेतला होता. त्यानंतर राज्यात लॉकडाउन लावावाच लागेल अशी स्थिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ फेब्रुवारी आणि २ एप्रिल रोजी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली होती. लॉकडाउन नको हवा असेल तर मास्क घालणे बंधनकारक असून , शारीरिक अंतर पाळणे आणि हात स्वच्छ धुणे हे नियम पाळावेच लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते.

२ एप्रिल रोजी त्यांनी राज्यात लॉकडाउन जाहीर करणे टाळले होते. मात्र, राज्यात कडक निर्बंध लावणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही करोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. हे पाहता आज मुख्यमंत्री राज्यात संपूर्ण लॉकडाउनची घोषणा करण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या