लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर:- जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ नगर जिल्ह्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे .पालकमंत्र्यांना नगरला घेऊन या पाच हजार रुपये मिळवा, अशी पोस्टर छापून ती वाहनांवर चिकटविण्यात येत आहेत. मनसेचे जिल्हा सरचिटणीस नितीन भुतारे यांनी ही मोहीम सुरू केली आहे. शहरातील रिक्षा, बस, अन्य वाहनांवर ही पोस्टर लावण्यात आली आहेत.
भुतारे यानी सांगितले कि, अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेली असून
जिल्ह्यात रेमडीसिव्हरचा काळा बाजार राजरोसपणे सुरु आहे. सामान्य नागरिकांना
रेमडीसिव्हर व बेड मिळत नाहीत , त्यामुळे अनेक जणांना आपल्या
जीवाला मुकावे लागले आहे. बेड व रेमडीसिव्हर, आक्सिजन
मिळत नसल्याने नागरिकांना आपल्या कुटुंबियांचे मरण उघड्या डोळ्यांनी
पहावे लागण्याची दूर्देवी वेळ ओढवली आहे .अनेक रूग्णांचे नातेवाईक बेड व
रेमडीसिव्हर, आक्सिजन साठी दिवस रात्र जिवाच्या आकाताने
मेडिकल हॉस्पिटलचे उंबरे झिजवत फिरत आहेत. या सर्व गोष्टींना प्रशासनाचा निष्काळजीपणा
व चुकीचे धोरण कारणीभूत ठरत आहे.
कोरोना
वरील लशीबाबत हि जिल्ह्यात तिच परिस्थिती असून लशीसाठी
नागरिकांना हेलपाटे घालायची वेळ आली आहे. तसेच यासर्व गोष्टीसाठी
नागरिकांची राजरोसपणे लुट सुरू आहे.
यासर्व गोष्टीचे नियोजन करण्यात जिल्हा प्रशासन व पालकमंत्री
पूर्ण पणे अपयशी ठरले आहेत . वास्तविक पालकमंत्री यांनी याबाबत प्रशासनाच्या
माध्यमातून नियोजन करणं गरजेचं होतं मात्र यात त्यांनी लक्ष घातल्याचे दिसून येत
नाही.नागरिकांना ऑक्सिजन बेड, रेमडीसिव्हर वेळेत उपलब्ध करून
देण्यास प्रशासन अपयशी ठरले असुन याबाबत
जिल्ह्यात परिस्थिती बिकट बनली आहे . इतर पालकमंत्री स्वत: परिस्थिती
हाताळ्त आहेत मात्र आपले पालकमंत्री जिल्ह्यात कधितरी येतात.
0 टिप्पण्या