लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर :– शहरामधील करोना बाधितांना
ऑक्सिजनची मोठी गरज भासत असताना एमआयडीसी येथील अहमदनगर
इंडस्ट्रीयल गॅसेस या कंपनीने ऑक्सीजनच्या उत्पादन प्रत्यक्ष कामास सुरवात केली
असून याठिकाणाहून सर्व हॉस्पिटलला ऑक्सिजन पाठवला जात आहे. याबद्दल शहर भाजपच्या
वतीने कंपनी प्रती कृतज्ञता व्यक्त करत संचालक रमेश लोढा यांचा माजी जिल्हाध्यक्ष भानुदास
बेरड व माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांची सत्कार करून आभार मानले. यावेळी शहर
उपाध्यक्ष सचिन पारखी, किशोर वाकळे, डॉ.अरविंद
डिक्कर, विलास लोढा राहुल लोढा, पंकज लोढा आदी उपस्थित होते.
यावेळी भानुदास बेरड म्हणाले, नगर जिल्ह्यात
मोठ्याप्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा होता. हा तुटवडा भरून काढण्यासाठी रमेश लोढा
यांनी आपल्या अहमदनगर इंडस्ट्रीयल गॅसेस कंपनीच्या माध्यमातून योग्य वेळी
मोठ्याप्रमाणात ऑक्सिजनचे उत्पादन सुरु करून नगरकरांना जीवनदान दिले आहे.
त्यांच्या या कार्याचा गौरव भारतीय जनता पार्टी करत आहे.
वसंत लोढा म्हणाले, करोना बाधित रुग्ण ऑक्सिजन
अभावी अत्यवस्थ होत आहेत. अशा संकट काळात आपल्या नगरच्या अहमदनगर इंडस्ट्रीयल
गॅसेस कंपनीच्या लोढा परिवाराने मुबलक ऑक्सिजनचे उत्पादन सुरू करून रुग्णांसाठी
वरदान दिले आहे. आता सर्वाना मुबलक ऑक्सिजन मिळणार असून पुढील काळात ऑक्सिजनचा
पुन्हा तुटवडा भासणार नाही.
0 टिप्पण्या