लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नवी दिल्ली : -देशात सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांची एका दिवसातली संख्या लाखांच्या पुढे गेलेली दिसतेय. आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात शुक्रवारी २४ तासांत १ लाख ४४ हजार ८२९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर याच २४ तासांत तब्बल ७७३ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय.
*आरोग्य सेवांवर ताण वाढला
वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा ताण आरोग्य सेवांवर पडत असतानाच दुसरीकडे दिवसेंदिवस ही संख्या वाढतच जाताना दिसतेय. यामुळे संपूर्ण देशात कोरोनाची धास्ती वाढलीय.
*असे वाढले रुग्ण*
१ एप्रिल : ८१ हजार ३९८
२ एप्रिल : ८९ हजार ०२३
३ एप्रिल : ९२ हजार ९९४
४ एप्रिल : १ लाख ०३ हजार ४९४
५ एप्रिल : ९६ हजार ५६३
६ एप्रिल : १ लाख १५ हजार ३१२
७ एप्रिल : १ लाख २६ हजार ७८९
८ एप्रिल : १ लाख ३१ हजार ८७८
९ एप्रिल : १ लाख ४४ हजार ८२९
0 टिप्पण्या