Ticker

6/Breaking/ticker-posts

येत्या आठ दिवसांत आणखी एक मंत्री राजीनामा देणार ; भाजपचा दावा

 








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबईः  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात बोलताना सरकारच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. येत्या आठ दिवसांत आणखी एक मंत्री राजीनामा देईल,' असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळं तो मंत्री कोणयाची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पुण्यात आयोजित मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांनी लॉकडाउन व अन्य मुद्द्यांवरून राज्य सरकारला लक्ष्य केलं. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरूनही त्यांनी सरकारला टोला हाणला. हायकोर्टाने ठोकले की मग मंत्र्यांचे राजीनामे घेतला जातातअसं पाटील म्हणाले. ' ३६ चेंडूंमध्ये २ विकेट गेल्या आहेत. उरलेल्या  विकेटची रांगच लागणार आहे. आतापर्यंत दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. येत्या आठ दिवसांत आणखी एक मंत्री पायउतार होईल. तो मंत्री कोणहे तुम्ही शोधा,' असं सूचक वक्तव्यही पाटील यांनी केला. ' तुम्ही तुमच्या कर्माने मरणार आहातपण सर्वसामान्य माणसांचे नुकसान करू नका,' असा चिमटाही पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला काढला.

आता कुणाच्याही कुबड्या घेणार नाही!

' राज्यातील राजकीय वाटचालीबाबत भाजपनं एक धोरण निश्चित केलं आहे. भाजप यापुढच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. २०२४ च्या निवडणुकीत दोन कोटी मतांचा टप्पा ओलांडण्याचं आमचं लक्ष्य आहे. आता कुणाच्याही कुबड्या नकोत. २०२४ मध्ये स्वबळावर निवडणुका लढवून सरकार स्थापन करू,' असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.


लॉकडाऊनवरून मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केल्याचा आरोप

राज्यातील करोना स्थिती व लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून पाटील यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्र्यांनी लोकांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे  यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी केवळ शनिवार आणि रविवारच्या मिनी लॉकडाऊन संदर्भात चर्चा केली होती. मात्र, प्रत्यक्षात कडक लॉकडाऊनची अधिसूचना प्रसिद्ध केली. ही फसवणूक आहे. भाजप व सर्वसामान्य जनता हे सहन करणार नाही,' असं पाटील म्हणाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या