तमाशा कलावंतांसाठी मदतीचा ओघ सुरूच
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नारायणगाव
:- “ मायबाप जनता जनार्दनाच्या प्रेमाने आम्ही अक्षरशः भारावून
गेलो असून आम्ही एक आवाहन केले आणि जनता लाखोंनी मदत करीत आमची झोळी भरत आहे, महाराष्ट्राच्या लोककलेवर जीवापाड प्रेम करणा-या जनतेचे
प्रेम आम्ही मरेपर्यंत विसरणार नाही ” अशी भावना तमाशा
फडमालक रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली.
देशभरात
कोरोनाचे संकट उभे राहिलेले असताना सर्व व्यवसाय देशोधडीला लागलेले असताना
अनेकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली यामध्ये तमाशा कलावंत देखील भरडला गेला असताना
मागील आठवड्यात एका वृत्तवाहिनीवर तमाशा कलावंत रघुवीर खेडकर व मंगला बनसोडे यांची
मुलाखत प्रसिद्ध झाली असताना अनेकांनी मदतीचा हात पुढे केला.पुण्यातील चंदननगरचे
पंढरीनाथ पठारे यांनी वैयक्तिक एक लाख रुपये, शिरूर
तालुक्यातील जातेगाव बुद्रुक ग्रामस्थांनी एक लाख रुपये, खराडी ग्रामस्थ मंडळींनी एक लाख रुपये, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी एक लाख रुपये
याशिवाय अनेकांनी मदतीचा हात पुढे केला असून मदतीचा ओघ चालूच आहे, असे खेडकर यांनी सांगितले.
0 टिप्पण्या