Ticker

6/Breaking/ticker-posts

रेमडेसिवीर इंजेक्शन : तर.. मग, रुग्णांच्या नातेवाईकांना विखेंचाच नंबर दिला असता; जयंत पाटील यांचा टोला

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वादग्रस्त खरेदीच्या मुद्द्यावरून जोरदार टोला हाणला आहे. आम्हाला आधीच समजलं असतं तर रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी आम्ही रुग्णालयांना सुजय विखे पाटील यांचाच संपर्क क्रमांक दिला असता, असे म्हणत जयंत पाटील यांनी विखे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. घडलेला प्रकार अतिशय गंभीर असून औरंगाबाद हायकोर्टाने विखेंवर कारवाईचे आदेश दिले आहेत. लोकप्रतिनीधी जर इंजेक्शन घेऊन बसायला लागले आणि त्याचे वाटप करायला लागले तर वैद्यकीय यंत्रणांना हे इंजेक्शन मिळवण्यात अडथळे येतील, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.


जयंत पाटील पुण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यांच्याकडे इंजेक्शन आहेत हे आम्हाला आधीच समजलं असतं तर आम्ही रेमडेसिवीरची गरज असलेले रुग्ण आणि डॉक्टरांना सुजय विखे पाटील यांचाच नंबर दिला असता, असा टोला हाणताना अशा प्रकारे राजकीय हेतू ठेवून काम करणे योग्य नसल्याचे पाटील पुढे म्हणाले.

जयंत पाटील यांनी यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. राज्यावर करोनाचे संकट असतानाही पालकमंत्री असलेले हसन मुश्रीफ यांचे अहमदनगर जिल्ह्याकडे लक्ष नाही
, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्यावर चंद्रकांत पाटील बोलतात त्या सर्वच गोष्टी खऱ्या नसतात, असे जयंत पाटील यांनी पाटील यांना टोला लगावला आहे. हसन मुश्रीफ यांचे अहमदनगर जिल्ह्यांवर व्यवस्थित लक्ष आहे. पुण्यात बसून अहमदनगरची मापे काढण्याचा प्रकार सर्वांनीच बंद करावा, असेही पाटील पुढे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या