लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
आष्टी : - तालुक्यातील कऱ्हेवाडी येथील स्वयंभू जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामदैवत शिवमल्हार ( खंडोबा ) यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने पार पडली .
सालाबादप्रमाणे चैत्र महिन्यातील पोर्णिमेच्या तिथीला शिवमल्हार यात्रा भरत असते . गेल्या वर्षापासून कोरोनामुळे गावोगावच्या यात्रा रद्द करण्यात आल्या . त्याच अनुषंगाने गेल्या वर्षी पासून पंचक्रोशित मोठी दीर्घ परंपरा असलेली जाज्वल्य ग्रामदैवत शिवमल्हार देवाची यात्रा देखिल साधेपणाने साजरी करण्यात येते . यावर्षि देखिल फक्त पुजाऱ्यांनी नियमित पुजा - अर्चा अभिषेक करून मानाची काठी देवाचे द्वारी बांधण्यात आली . शासनाचे नियमानुसार कोरोनाचे सर्व नियम पाळून स्वतंत्रपणे धार्मिक पुजा (तळीभंडार ) करण्यात आला .
शिवमल्हार यात्रा पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. नवसाला पावणार देवस्थान म्ह्णुन भाविकांची श्रद्धा आहे. दरवषी हा यात्रोत्सव मोठ्या धूमधडाक्यात पार पडतो . यात्रेसाठी दूरवरून भक्तगण आवर्जुन हजेरी लावत असतात . आस-पासच्या गावांतील पाहुणे मंडळी मोठ्या प्रमाणावर येत असतात , भव्य दारुकाम , सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच कुस्त्यांचा हंगाम होत असे . परंतु कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी भक्तगण व गांवकरी मंडळींच्या उत्साहावर विरजण पडले आहे . कोरोना मुळे यंदाही केवळ धार्मिक पुजा - अर्चा एवढ्यावरच तमाम भक्ताना समाधान मानावे लागले .
0 टिप्पण्या