लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव (जगन्नाथ गोसावी) :-शेवगावच्या श्रीदत्त देवस्थानचे आधारस्तंभ,अष्टांग योगतज्ञ वै.प.पू दादाजी वैशंपायन यांच्या सहचारिणी शिवभक्त श्रीमती प्रमिलादेवी वैशंपायन आज मंगळवारी (दिं.२७ रोजी) हनुमान जयंतीच्या शुभपर्वणीला ९१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.
कल्याण, (जि.ठाणे) येथील रहिवासी असलेल्या श्रीमती प्रमिलादेवी वैशंपायन यांचा जन्म सन १९३० मध्ये हनुमान जयंतीच्या शुभदिनी उपळे, (ता. राजापूर, जि.रत्नागिरी) येथे सत्शील ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना पूर्वसुकृते अष्टांग योगतज्ञ दादाजी वैशंपायन हे पती ' देव 'स्वरूपात लाभले. त्यांना अनुक्रमे सुरेश(अण्णा) व शरद(काका) ही मुले आहेत. त्या नि:स्सीम शिवभक्त असून त्यांनी एकटीने पूज्य दादाजींच्या आदेशाने तीर्थक्षेत्र हरिद्वारच्या घोर अरण्यात तपश्चर्या केलेली आहे. मंत्र सामर्थ्याने त्या नागराज प्रकट करतात.
शिवाच्या उपासक असलेल्या प्रमिलादेवी वैशंपायन यांना ' शिवलीलामृत ' हा प्रासादिक ग्रंथ मुखोद्गत आहे. त्या गो सेवा व अन्नादानाला अत्यंत महत्त्व देतात.त्या शास्त्रीय संगीताची परीक्षा उत्तीर्ण असून त्यांना गायनाची विशेष आवड आहे. त्यांनी श्रीक्षेत्र आळंदी येथे सुवर्ण पिंपळास सव्वा वर्षात सव्वा लाख प्रदक्षिणा पूर्ण केल्या.तर,श्रीक्षेत्र देहू येथे श्रीराम नामाचा जप लिहून सव्वा लक्ष श्रीराम गोळ्या सव्वा वर्षात देहूच्या देवमाशांना अर्पण केल्या. सामान्य गृहिणीचे साधे जीवन जगणार्या या आदिशक्तीने दिव्य साधनेने मोठा आध्यात्मिक अधिकार प्राप्त केलेला आहे.
0 टिप्पण्या