;माका गावाजवळ वळणावरील दुर्घटना
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव :- (जगन्नाथ गोसावी) शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड - पागिरे यांच्या खाजगी वाहनाला आज सोमवारी (दिं.१९) दुपारी पांढरीपुल - शेवगाव रस्त्यावर माका (ता. नेवासा) गावानजीक वळणावरील पूलावर अपघात झाला. ही घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. तहसीलदार पागिरे या अपघातातून बालंबाल बचावल्या. त्या स्वतः कार चालवत होत्या. त्यांच्या सोबत कोणीही नव्हते. असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यांच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. त्यांची प्रकृती उत्तम आहे.
तहसीलदार पागिरे यांचे माका हे सासर आहे. काल रविवारी (दिं.१८) रात्री उशिरा त्या आपल्या खाजगी वाहनाने सासरी गेल्या होत्या. आज (सोमवारी)दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्या शेवगावकडे येत असताना माका गावाजवळील ओढ्यावरील पुलावर त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार ओढ्यात कोसळली. सध्या माका परिसरात मुळा कॅनॉलचे पाण्याचेआवर्तन सुरू असल्याने ओढ्याला पाणी आहे. कार ओढ्यात कोसळल्याचे नजीकचे शेतकरी व वाटसरू यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली व त्यांना सुखरूप गाडीबाहेर काढले.
या अपघातात त्यांच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे नायब तहसीलदार रमेश काथवटे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या