Ticker

6/Breaking/ticker-posts

गुटख्याच्या कारखान्यावर छापा

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

औरंगाबाद :-खुलताबाद तालुक्यातील खिर्डी येथे कोहिनूर मंगल कार्यालयात सुरू असलेल्या बेकायदा सुगंधित तंबाखू ( गुटखा) कारखान्यावर खुलताबाद पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणाहून तीन लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलीसांनी मंगल कार्यालयाच्या मालकासह दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.

खुलताबाद पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, खिर्डी- मावसाळा रस्त्याच्या लगत असलेल्या कोहिनूर मंगल कार्यालयात मंगल कार्यालयाचे मालक मोहम्मद फरीद महंमद जकेरीया हा अवैधरीत्या सुगंधित तंबाखू ( गुटखा) तयार करत आहे. तो या मालाची चढ्यादराने विक्री करत आहे, अशी खबर खुलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांना मिळाली. पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी पोलिस उपनिरीक्षक दिनेश जाधव, यतीन कुलकर्णी, सुहास डबीर, अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधववर, नायब तहसीलदार प्रभाकर गवळी , नायब तहसीलदार देशमुख यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी अडीच वाजता या कार्यालयावर छापा टाकला.

या वेळी सुगंधित तंबाखू गुटखा तयार करण्याचे साहित्य व सामग्री यासह सुगंधित तंबाखू गुटखा तयार करण्यासाठी लागणारे विविध प्रकारची रसायने सापडली. सुगंधित तंबाखू तयार करणारा आरोपी मुश्ताक अली सय्यद याला ताब्यात घेतले. या ठिकाणी पोलिसांना सुगंधित तंबाखूचा मोठा साठाही सापडला. या ठिकाणी पोलिसांना एकूण ३ लाख १८ हजार ९५० रुपयांचा सुगंधित तंबाखू गुटखा सापडला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधववर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारखाना चालवणारा महंमद फरीद महंमद जकेरीया (रा. औरंगाबाद) व मुश्ताक अली सय्यद या दोघांविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या