( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
करंजी:- पाथर्डी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत
असल्यामुळे करंजी गावातही रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता करंजी येथे शनिवार
दिनांक तीन एप्रिल ते सहा एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात येणार असून चार
दिवस करंजी गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार
असल्याची माहिती उपसरपंच दयाबाई भाऊसाहेब क्षेत्रे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना उपसरपंच श्रीमती क्षेत्रे यांनी
सांगितले की करंजी गावातही कोरोणाचे रुग्ण वाढत आहेत हा आकडा जवळपास 22 पर्यंत गेला असून खबरदारी
म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच बाळासाहेब आकोलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार
पडलेल्या बैठकीत ग्रामपंचायतने शनिवार पासून पुढील चार दिवस गावातील अत्यावश्यक
सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या चार दिवसाच्या कार्य काळामध्ये आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात
येत आहेत. तरि सर्वांनी सहकार्य करावे तसेच कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये म्हणून
कोरोना बाबचे सर्व नियम व अटींचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन उपसरपंच क्षेत्रे
यांनी यानिमित्ताने केले आहे.
0 टिप्पण्या