तरुण मुलगा मटक्याचे आहारी, लाखोंचे कर्ज झाले, पित्याने जमीन विकून केला गळा मोकळा ..!
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
सोनई :-माझ्या तरुण मुलाने मटका
जुगाराचे आहारी जाऊन लाखो रुपयांचे कर्ज करून ठेवले, अद्याप मुलाचे लग्न व्हायचे
आहे पण कर्जापायी मुलगा आत्महत्येचे विचारात होता म्हणून मी माझी स्वतःची शेतजमीन
विकून हे मोठे कर्ज भरले मात्र लोकांचे प्रपंचाशी खेळणारा हा मटका व्यवसाय बंद कधी
होणार? असा त्रस्त सवाल जमीन विकलेल्या या पित्याने स्वतःचे
नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर विविध प्रश्न उपस्थित केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की या त्रस्त पित्याचा मुलगा अविवाहित आहे परंतु गेल्या काही दिवसापासून माझा मुलगा मटका या जुगाराचे नादी लागल्याची माहिती मला मिळाली आहे मुलाने मला न समजता सोनई, शिंगणापूर, घोडेगाव, वडाळा बहिरोबा येथे जाऊन तेथील पेढीवर दररोज लाखो रुपयांचा खेळ केला मात्र यात तो फेल होत गेला मग मिळेल तेथून कर्ज उपसण्यास मुलाने सुरुवात केली व कर्जाच्या रकमेतून मुलगा दररोज दिवस-रात्र मटका खेळत होता अशी माहिती आपल्याला आता मिळालेली आहे काही अंशी मुलानेही तशी कबुली दिल्याची माहिती या त्रस्त पित्याने देताना म्हटले आहे.
या मटक्या पायी मुलाचा व्यवसाय पूर्ण बसला डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने तो घरातच तोंड लपवू लागला अद्याप त्याचे लग्न करायचे आहे परंतु कशी सोयरीक करायची व हाता खांद्यावर वाढविलेल्या मुलाची आत्महत्या नको म्हणून मी स्वतःची जमीन विकून सर्व कर्ज भरून टाकले मी सुशिक्षित व्यापारी लाइनचा शेतकरी असून माझी जमीन गेली परंतु या सर्व घटना होत असताना या भागात हा 'मटका' एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालतोच कसा असा माझा सवाल असून याबाबत आपण वृत्तपत्रातून आवाज उठवून सोनई शिंगणापूर घोडेगाव वडाळा व खेडोपाडी चालणारा मटका व कायमस्वरूपी बंद करण्याचे प्रयत्न करावेत अशी विनंती पत्रकारांना केली. हि घट्ना केवळ प्रातिनिधीक असुन नगर जिल्ह्यासह राज्यभर हा प्रश्न सर्वसामान्याना सतावत आहे.
नाव का नको?
या त्रस्त पित्याला पत्रकाराने प्रश्न केला
की आपली तक्रार आहे मग आपले नाव का छापायचे नाही तर ते म्हणाले की माझ्या घरात
काय-काय रामायण-महाभारत झाले परंतु ते आता निस्तारले, मुलाचे
लग्न अद्याप व्हायचे आहे पण मटक्याचा नाद, जमीन विकली अशी
माहिती माझे नावाने उघड झाली तर मुलाला सोयरीक कशी येणार? हा
महत्त्वाचा प्रश्न असल्याने कृपा करून माझे नाव गाव प्रसिद्ध न करता बातमी द्यावी
अशी विनंती त्या त्रस्त पित्याने केली
मटक्याला आशीर्वाद कुणाचे?
सध्या नेवासा तालुक्यात जोरदारपणे चालू असलेला व ग्राहकांचे प्रपंचाची राखरांगोळी करून बुकींना 'गब्बर' करणारा मटका व्यवसायाला नेमका आशीर्वाद कुणाचा असा सवाल असून केवळ स्थानिक पातळीवरचे अधिकारी व बिटला काम करणारे कर्मचारी यांच्या 'अर्थपूर्ण' कृपा आशीर्वादामुळे मटका व्यवसाय दिवसाढवळ्या लोकांची लूट करीत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीरपणे दखल घ्यावी अन्यथा या मटका प्रकरणात पुढील काळात आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे
0 टिप्पण्या