Ticker

6/Breaking/ticker-posts

पाथर्डीत कोवीड आढावा बैठक ; उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या विविध सुचना

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पाथर्डी:- कोरोना संशयीत रुग्णाच्या तपासणीमध्ये वाढ करावीशहरात अधिक कोवीड सेंटर सुरु करावेत. शहरातील  शेवगावरस्ता व कैं.माधवराव नि-हाळी सभागृहाजवळील अतिक्रमणाबाबत नगपालिकेच्या मुख्याधिका-यांनी कारवाई करावी.  उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड लसीकरणाचे आणखी एक केंद्र वाढवावे असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. कोवीडच्या परस्थीतीचा आढावा घेण्यासाठी भोसले यांनी तहसिल कार्यालयात गुरुवारी सर्व यंत्रणेच्या प्रमुखांची बैठक घेतली.

 प्रांतअधिकारी देवदत्त केकाण,तहसिलदार शाम वाडकर,तालुकाआरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक कराळे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर उपस्थीत होते. 

 आढावा बैठकीनंतर पत्रकरांशी बोलताना भोसले म्हणाले, येथील कोवीड परस्थीती वाढतच आहे. तीन कोवीड सेंटर सुरु आहेत. पाचशे रुग्ण कोवीड पाँझीटीव्ह आहेत. बाधीतांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्याचा वेग वाढवावा लागेल तशा सुचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. नगर पालिकेच्या मुख्याधिका-यांना अतिक्रमण काढण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.त्यांनी वेळेत काम करावे अन्यथा कारवाई केली जाईल. महसुल विभागाकडुनही कोवीड परस्थीतीवर नियंत्रणासाठी आणखी चांगल्या कामाची गरज आहे. शहरात प्रभागनिहाय नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी व कोवीडबाबत चांगले काम करावे. येथील विरसावरकर मैदानात भरलेल्या भाजीबाजारातील गर्दी बाबत चौकशी करा. वेळ पडली तर बाजार बंद करा. 

 पालिकेने पथक नेमुन बाजारातील गर्दीवर नियंत्रण करावे .

 जिल्हाधिका-यांनी उपजिल्हा रुग्णालय व नवजीवन वस्तीगृह येथील कोवीड सेंटरला भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, भाजपाचे मुकुंद गर्जे, रामनाथ बंग, मनसेचे संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे,मनोज गांधी,अभिजित गुजर यांनी जिल्हाधिकारी भोसले यांच्या समोर शहरातील अडचणी मांडल्या. भोसले यांनी अधिका-यांची चांगलीच कानउघडणी केली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक कराळे यांनी मुख्यालयातच पाथर्डी येथेथांबुन रहावे असे भोसले यांनी सांगितले. कोरोना बाधित रुग्ण सर्रासपणे बाहेर फिरत आहे यावर गांभीर्याने लक्ष देण्याचे मुकुंद गर्जे यांनी या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले .

उपजिल्हा रुग्णालयात तातडीने पदे भरण्याची मागणी

अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानचे अनिल हरेर, शहनवाज शेख यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून उपजिल्हा रुग्णालयातील वाढीव बेड व्हावेत, स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक व्हावी,आरोग्य कर्मचाऱ्यांना पोलीस स्वरक्षण  मिळावे,विद्युत, पाणी,सौचालयाची दुरवस्था उपजिल्हा रुग्णालयातील झाली आहे. पुरेसे कर्मचारी नसल्याने अतिरिक्त कामाचा ताण कर्मचाऱ्यावर पडत आहे. तातडीने पदे भरावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या