Ticker

6/Breaking/ticker-posts

ऊसतोडणी कामगारांना करोना कालावधीत अनुदान दयावे : 'मनसे ' जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या मेलमध्ये केली मागणी


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 खरवंडी कासार:- महाराष्ट्रातील साखर कारखानदारी ज्यांच्या जीवावर चालते असा ऊस तोडणी कामगार हा करोना च्या काळात उपासमारी वर आला आहे महाराष्ट्र शासनाने असंघटित व संघटित क्षेत्रातील विविध कामगारांना अनुदान दिलेले आहे त्याप्रमाणेच उसतोड कामगारानाही अनुदान द्यावे अशी  मागणी मनसे ' जिल्हा अध्यक्ष देवीदास खेडकर यांनी मुख्यमत्र्यांना मेल  केला  आहे 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या मेल मध्ये म्हटले आहे की , महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचीही साखर कारखानदारी ऊस तोडणी कामगारांच्या जीवावर चालते मात्र ऊस तोडणी कामगारांच्या हलाखीच्या जीवनाकडे ही पांढरेशुभ्र साखर खाणारे व पांढरे शुभ्र कपडे घालणारे साखर सम्राट पुढारी डोळेझाक करत आहेत. महाराष्ट्रातील कोयता बंद झाला तर साखर कारखानदारी बंद होईल.

 मात्र गेल्या एक वर्षापासून कोरोणाच्या महामारीत हा कामगार महाराष्ट्र शासनाकडून दुर्लक्षित राहिलेला आहे या कामगारांवर उपास मारीची वेळ आलेली आहे , लहान मुलं उपाशी पोटी राहताना दिसत आहेत. कामगारांना इतर कामे मिळणे बंद झाले आहे, म्हणून महाराष्ट्र शासनाने ऊस तोडणी कामगारांसाठी साखर कारखानदार साखर संघ व महाराष्ट्र शासन या तिघांच्या संयुक्त विद्यमाने ऊस तोडणी व वाहतुकीची कामे करणाऱ्या आमच्या कामगारास करोना काळात प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे अनुदान द्यावे जेणेकरून ऊस तोडणी कामगारांचे कुटूंबास जीवनावश्यक वस्तू घेता येतील त्यामुळे दिलासा मिळून काही प्रमाणात उपासमार कमी होईल, असे खेडकर यांनी म्हटले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या