Ticker

6/Breaking/ticker-posts

'बाळासाहेबांची शपथ घेतो पण...'; वाझेंच्या आरोपांवर अनिल परब यांचे उत्तर

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबईः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. सचिन वाझेंनी एनआयएला लिहलेल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे.

सचिन वाझे यांच्या आरोपांना उत्तर देताना अनिल परब यांनी आपण कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. तसंच, माझ्या दोन मुलींची व बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो. माझ्यावरील आरोप खोटे आहेत, मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. ' सचिन वाझेंनी केलेल्या आरोपांचा परमबीर सिंग यांच्या पत्रात कुठेही उल्लेख येत नाही. पण मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करणं गरजेचं आहे. यातून सरकारला बदनाम करण्याचा धोरणाचा भाग आहे,' अशी शंका अनिल परब यांनी उपस्थित केली आहे.


'सचिन वाझेंनी केलेले दोन्ही आरोप धादांच खोटे आहेत. ते दोन्ही आरोप मी नाकारतोय. मी सच्चा शिवसैनिक आहेत. माझ्यावर खंडणीचे संस्कार नाहीत,' असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.


' काही दिवस भाजपचे पदाधिकारी आरडा ओरडा करत होते की आम्ही तिसरा बळी घेऊ. याचा अर्थ त्यांना  दोन तीन दिवसांपासून या गोष्टींची कल्पना होती. सचिन वाझे आज एनआयए कोर्टात पत्र देणार हे त्याना आधीपासून माहिती होतं. म्हणून ते गाजावाजा करत होते,' असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.


'केंद्रीय यंत्रणेला हाताशी धरुन त्यांनी आरोप केले आहेत. या पत्रात वाझेंनी माझ्यावर, अनिल देशमुख आणि अजित पवार यांच्या जवळीचा माणूस त्यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी केलेले दोन आरोपांशी माझा काहीही संबंध नाही. महापालिकेच्या कुठल्याही कंत्राटदारासी माझी ओळख नाही,' असं स्पष्टीकरण अनिल परब यांनी केलं आहे.

सचिन वाझेंचा काय आरोप?

शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी भेंडी बाजारमधील सैफी बुऱ्हानी ट्रस्टतर्फे सुरू असलेल्या भव्य क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाची चौकशी करावी आणि त्यांच्या ट्रस्टीना वाटाघाटी करण्यासाठी माझ्यासमोर आणावे. त्यांच्याकडून ५० कोटी रुपये वसूल करण्यासाठी तू प्राथमिक बोलणी करून घे, असे मला त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलवून सांगितले", असा खळबळजनक आरोप सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या