Ticker

6/Breaking/ticker-posts

अशोक कुटे व गोरख गहिले यांच्या पुढाकारातून कोव्हिड सेंटरला १५ बेडचे वितरण कौतुकास्पद -डॉ.संजय कळमकर

  


चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयाला बेडचे वितरण करताना डॉ.संजय कळमकर,अशोक कुटे,अमित कळमकर आदी. (छाया : सोहेल मनियार)


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नगर : तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयाला केडगाव ता.नगर येथील अशोक कुटे व गोरख गहिले यांच्या पुढाकारातून कोविड सेंटरला १५ बेड वितरणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे प्राथमिक शिक्षक समितीचे सांस्कृतिक मंडळाचे राज्याध्यक्ष डॉ.संजय कळमकर म्हणाले.

जेऊर येथील व चिचोंडी पाटील येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळून १५ चांगल्या दर्जाचे बेड कोविड सेंटरला कायमस्वरूपी भेट देण्यात आले. यासाठी नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

नेवासा येथे कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक अशोक कुटे व अरणंगाव येथील उद्योजक गोरख गहिले यांनी वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला दोन बेड भेट देण्याचे ठरवले होते. त्याच काळात कुटे सरांचे साडू बंधू पंचगंगा उद्योग समूहाचे संचालक मा .प्रभाकरराव शिंदे पा व श्री काकासाहेब शिंदे यांनी नेवासा कोविड सेंटरला १०० बेड  , २ मिनी अँम्बुलस, २० नवीन ऑक्सिजन सिलेंडर कायमस्वरूपी भेट दिले होते... आपल्या साडू बंधूंची प्रेरणा घेऊन या दोघांनी मोठ्या प्रमाणात बेड व इतर मदत भेट देण्यासाठी सोशल मीडिया वर आव्हान केले. यामध्ये भिंगार येथील कै. गोपाळराव झोडगे यांचे पुत्र पिंटूशेठ झोडगे यांनी फक्त व्हाट्सअप च्या आवाहनावर  काही ओळख नसताना रोख स्वरूपात बेड साठी भरीव मदत दिली. तसेच केडगाव येथील इयत्ता चौथी च्या वर्ग मित्रांचा एक  व्हाट्सअप वर झेडपी ग्रुप आहे.त्या ग्रुपमधील सात मित्रांनी सात बेड भेट दिले. यांच्यामार्फत अजुनही केडगांव व इतर कोव्हिड सेंटरला वेगळी मदत देण्यात येणार आहे. मदत देण्यासाठी समाजाने ९८५०२०३९१४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. 

 बेड देणार्‍यांची नावे पुढील प्रमाणे-

 पिंटूशेठ गोपाळराव झोडगे, गोरख काशिनाथ गहिले , मा बबनराव लोंढे, कै .प्रभाकर गुंड , जयश्री अशोक कुटे ,योगेश कटारे सर, संदीप सायंबर, इंजी. अनिल साळुंखे साहेब ,बाळासाहेब पठारे ,गणेश नन्नवरे, योगेश विजय हजारे ,प्रविण येवले ,मंगेश सातपुते , संदीप सर्जेराव कोतकर, यांनी बेड दिले.

बेड दिल्याने जेऊरचे आरोग्याधिकारी  डॉ.  कर्डिले , चिचोंडीचे डॉ. नेवसे,कर्मचारी तोडमल यांनी समाधान व्यक्त केले. सदर उपक्रमासाठी जयश्री कुटे, महेश पवार, वैभव निकम, श्रद्धा  मॅडम ,अमित कळमकर, श्री बाळासाहेब पवार, नंदू वाव्हळ , श्री गणेश लंघे, मराठी सोयरीक संस्थेचे कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. तसेच मराठा उद्योजक लॉबी ,सकल मराठा समाज मदतकार्य करत आहे. जिल्हयातील  विविध प्राथमिक शिक्षक संघटनानी एकत्रित लाखो रुपयांची मदत दिली आहे. 

अशोक कुटे ह्या प्राथमिक शिक्षकाने व त्यांच्या विविध क्षेत्रातील मित्रांनी दर्जेदार १५ बेड देवून ग्रामीण भागात योग्य मदत केली आहे.-

उमेश पाटील  

तहसीलदार नगर



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या