लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
बीड : मी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे का ? आष्टी, शिरूर तालुका काय पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे काय? असा संतप्त सवाल करत. लोक दिवस रात्र रेमडिसीवरसाठी इकडे तिकडे फिरत आहेत. आणि तुम्ही नुसते कागदी घोडे नाचवत आहात. अशा शेलक्या शब्दांत समाचार घेत आ.सुरेश धस यांनी आज जिल्हाधिकार्यांसह प्रशासनातल्या अधिकार्यांना रेमडिसीवीर इंजेक्शन मिळत नसल्याने धारेवर धरले .
जिल्ह्यात रेमडीसिविर इंजेक्शन वरून वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना धारेवर धरलंय. दरम्यान यावेळी आमदार धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच गोंधळ घातला आहे. जिल्ह्यात रेमडीसिविर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असून जिल्हा प्रशासनाचं यावर कोणतंही नियंत्रण नाही. आणि याच पार्श्वभूमीवर भाजपसह सर्व पक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली होती. आणि यावेळी जिल्हाधिकार्यां बरोबर झालेल्या बैठकीत धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरलं, तब्बल 15 मिनटं आमदार धस आणि अधिकाऱ्यांमध्ये खड्डजंगी झाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे हाश्मी आणि डोईफोडे प्रायव्हेट रूग्णालयातले इंजेक्शन जप्त करत आहेत ते कुठे जात आहेत? असा सवाल करत क्रियाशील असलेले सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी आज गणपत पाटलाचे मावसभाऊ झाल्यासारखे वाटत आहे अशी हताश प्रतिक्रिया आजच्या परिस्थितीवर आ.धसांनी दिली.उद्यापर्यंत रेमडिसीवर इंजेक्शन व्यवस्थीतपणे सर्वांना मिळाले नाही तर आंदोलन करू. असा इशारा आ.सुरेश धस, लक्ष्मण पवार यांच्यासह बहुजन वंचित आघाडीचे अशोक हिंगे, एमआयएमचे पदाधिकारी नगरसेवक सह अन्य उपस्थित पदाधिकारी नागरिकांनी दिला.
0 टिप्पण्या