Ticker

6/Breaking/ticker-posts

'गोकुळची सत्ता आल्यानंतर मायबहिणींना सोन्याने मडवून टाकू'

 









लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क).

कोल्हापूर :- 'गोकुळ दूध संघाची सत्ता राजकारणासाठी नाही शेतकऱ्यांसाठी हवी. गोकुळमधला पैसा चुकीच्या मार्गाला जात आहे तो जाऊ नये अशी इच्छा आहे. बदल घडवण्याचा निर्णय ठरावधारकांनी घेतला आहे, असं सांगतानाच, 'गोकुळची सत्ता आल्यानंतर मायबहिणींना सोन्याने मडवून टाकू,' असा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

' गोकुळ'ची निवडणूक दोन मे रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत मुश्रीफ बोलत होते. ' आम्ही अनेक चांगल्या संस्था चालवत आहोत. त्यामुळे गोकुळमध्ये आम्ही राजकीय अड्डा तयार करू हा सत्ताधारी आघाडीचा आरोप चुकीचा आहे. अनेक वर्षे ते गोकुळ मध्ये ठाण मांडून आहेत. त्यांना हुसकावून लावत परिवर्तन करण्याची वेळ आली आहे. सभासदांनी तसा निर्णय घेतला आहे. त्यांनी जरी चारशे वाढीव सभासद केले असले तरी राष्ट्रवादीचे हजार सभासद आमच्या बरोबर असल्याने आमचा विजय निश्चित आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधारी आघाडीला दिलेला पाठिंबा अनाकलनीय असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

महाडिकांची धडपड टँकर वाचवण्यासाठी - गृहराज्यमंत्री सतेज पाटील


'आम्ही गोकुळ दूध संघाच्या हितासाठी एकत्र आलोय, मात्र ईस्ट इंडिया कंपनीसारखे बाहेरून आलेले महाडिक आणि कंपनी एकेक करत कोल्हापूर जिल्ह्यातील संस्था ताब्यात घेत आहेत, गोकुळमधील साडे पाच लाख सभासदांच्या जीवावर ते मोठे झालेत, त्यांच्यामुळे एकही सभासद मोठा झाला नाही, आता केवळ टँकर वाचविण्यासाठीच त्यांची धडपड सुरू आहे,' असा आरोप गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला.

' आमची युती अभद्र असल्याची टीका सत्ताधारी आघाडीने केली. पण दोन नंबर वाल्यांनी आम्हाला अभद्र म्हणणे हा विनोदच आहे. चार वर्षापूर्वी धनंजय महाडिक यांनी महादेवराव महाडिक यांचा गोकुळमध्ये एकही टँकर नाही असे भाषण केले होते. आता चाळीस टँकर असल्याचे तेच सांगत आहेत. त्यांचा खोटा चेहरा जनतेसमोर आला आहे. अतिशय खोटं बोलणारा हा माणूस आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने पावणे तीन लाख मतांनी त्यांना नाकारले, आता गोकुळमध्येही तेच होणार आहे,' असं पाटील म्हणाले.

मंत्री पाटील म्हणाले, देशातील अनेक दूध संघ ८५ ते ९२ टक्के परतावा सभासदांना देत आहेत. गोकुळ मध्ये मात्र हा परतावा ८१ टक्के आहे. आम्ही ८५ टक्के परतावा कसा देता येईल हे पाहणार आहे. त्यासाठी प्रक्रिया खर्च कमी करण्यात येईल. केवळ टँकरची जरी व्यवस्थित निविदा काढली तर सभासदांना लिटरला एक रूपये जादा दर देता येईल. आम्ही तेच करणार आहोत.'

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या