Ticker

6/Breaking/ticker-posts

' हे 'पवार साहेबांचं सरकार, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय'


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पंढरपूर :- एकीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या मैदानात उतरत 'अरे सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा', असे विधान केले व महाविकास आघाडी सरकार आता औटघटकेचे आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरून आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गाण्यातून टोलेबाजी केली.

  लोकगायक आनंद शिंदे हे मूळचे मंगळावेढ्याचे आहेत. त्यांचे आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याच प्रेमाखातर आनंद शिंदे हे भारत भालके यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ सोमवारी मंगळवेढ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी स्वर्गीय भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा देताना भगीरथ भालके यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.   आनंद शिंदे यांच्या सभेच्या आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवेढ्यात सभा झाली होती. त्या सभेत फडणवीस यांनी सरकार पाडण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. तोच धागा पकडत गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता 'त्यांना सांगायचंय मला' असे म्हणत फडणवीसांच्या वक्तव्याचा एका गाण्याच्या माध्यमातून समाचार घेतला.   

तुम्ही चिडवताय, आम्ही चिडणार नाय. 

तुम्ही लय काय करताय, तसं काय घडणार नाय.

 तुम्ही रडवताय पण आम्ही रडणार नाय.

 हे पवार साहेबांचं सरकार हाय,

 तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय.

  आनंद शिंदे यांनी हे गाणे वाचताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला. यावेळी धुरळा चित्रपटातील 'नजर धारदार माणूस दमदार' हे गाणे गात शिंदे यांनी भगीरथ भालके यांच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या