लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नवी दिल्ली : पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे.
त्यासाठी
सर्वांनी नियम पाळायला हवेत. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे, असं मोदी म्हणाले. देशातील कोरोनाबाधितांचा
वाढता आकडा लक्षात घेता पंतप्रधान गेल्या काही दिवसांपासून विविध घटकांशी चर्चा
करत आहेत. मोदींची आज लस उत्पादन कंपनीशी चर्चा झाली, त्यानंतर
मोदींनी देशाला संबोधित केलं.
जनभागीदारीतून
कोरोनाचं हे तुफान उधळून लावू. या संकटाच्या काळात देशवासियांनी पुढे यावं आणि
गरजवंतांना मदत करा. समाजाचा पुरुषार्थ आणि सेवाभावनेतून ही लढाई जिंकू शकू, असं
नरेंद्र मोदींनी सांगितलं.
देशाला लॉकडाऊनपासून
तुम्हीच वाचवू शकता. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय आहे. लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ नये, असं
मोदी म्हणाले.
तरुणांना आवाहन
“ माझी
तरुणांना विनंती आहे. त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी
कमिटी बनवून कोव्हिड नियम लागू करण्यासाठी मदत करावी. आपण तसं केलं तर लॉकडाऊन
लावण्याची आवश्यकता लागणार नाही. स्वच्छता अभियानसाठी पाचवी ते दहावीच्या
बालमित्रांनी खूप मदत केली होती. त्यांनी घरच्यांना आणि लोकांना स्वच्छतेचा संदेश
दिला होता. आज त्यांना मी विनंती करतो, घरात असं वातावरण
तयार करा की, घरातील लोक विनाकारण घराबाहेर पडू नये.
प्रसारमाध्यामांनीही लोकांना सतर्क करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आणखी वाढवावे.
तसेच लोकांमध्ये भीती आणि अफवा वाढू नये. याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला देशाला
लॉकडाऊनपासून वाचवलायचं आहे. राज्यांनी शेवटच पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय
घ्यावा”, असं पंतप्रधान म्हणाले.
0 टिप्पण्या