Ticker

6/Breaking/ticker-posts

राज ठाकरेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

 परेल येथील हाफकिन संस्थेला लस निर्मितीची परवानगीची मागणी मान्य .








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : -राज्यात सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्यात दररोज ५० हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ५० हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट थोपवण्यासाठी ठाकरे सरकारने लॉकडाउन सदृश्य निर्बंध लागू केलेत. राज्य सरकारने कोरोनाची ही साखळी मोडण्याला ‘ब्रेक द चेन’चे नाव दिले आहे. कोरोनाची ही दुसरी लाट थोपविण्याचा सध्या तरी लसीकरण हा एकमेव उपाय दिसत आहे.

महाराष्ट्रात लसीकरण वेगात सुरु आहे. दररोज ६ लाखापर्यंत नागरिकांचे लसीकरण करण्याचा सरकारचे लक्ष्य आहे. मागच्या आठवड्यात सरकारची तयारी असूनही लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. राज्यातील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही मागण्या केल्या होत्या. त्यात परेल येथील हाफकिन संस्थेला लस निर्मितीची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. राज ठाकरेंची ही मागणी मोदी सरकारने मान्य केली आहे. त्याबद्दल राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या