Ticker

6/Breaking/ticker-posts

रुग्णांच्या जीवाशी खेळ! बारामतीत बनावट रेमडेसिवीरची सुरु होती विक्री

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

बारामतीः रेमडेसिविरचा काळाबाजार सुरु असताना दुसरीकडे या इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत लिक्विड भरून ते इंजेक्शन म्हणून अव्वाच्या सव्वा दराला विकण्याचा लाजिरवाणा प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. बारामती तालुका पोलिसांच्या सतर्कतेमुळे बनावट रेमडेसीव्हर विकणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आलं आहे. यासंबंधी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.चौघेजण या टोळीत सहभागी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

बारामतीत सर्वत्र रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या काळात रुग्णसेवेसाठी अनेकजण पुढाकार घेऊन काम करत असताना एकीकडे दुसरीकडे करोना संकटही वाढत आहे. या दरम्यान, प्रशासन नेमके काय करत होते?, असा सवालही आता उपस्थित होत आहे.

रुग्णाला रेमडेसिवीरची गरज असल्यानं नातेवाईकांनी या टोळीत कार्यरत असलेल्या एका सदस्याशी संपर्क साधला. कोविड हेल्थ सेंटरमध्ये काम करणाऱ्या या तरुणाकडे इंजेक्शन असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यामुळं इंजेक्शनची विक्री करणाऱ्या तरुणानं रुग्णाच्या नातेवाईकाला फलटण चौकात बोलावून घेतले. व एका इंजेक्शनचे ३५ हजार तर, दोन इंजेक्शनचे ७० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली होती.

सुदैवानं पोलिसांना ही घटना समजताच त्यांनी वाहनांसह या टोळीतील काहींना ताब्यात घेतले. कोविड सेंटरमधील रिकाम्या झालेल्या रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये लिक्विड भरुन ती बाटली व्यवस्थित पॅक करत हे बनावट औषध तयार करून ते विकले जात होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बनावट औषधांमुळं रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात होता. दरम्यान, या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून तक्रार घेत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या