.लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
संगमनेर :- ‘जेथे सर्वसामान्य लोकांना रेमडेसिविरचे एक इंजेक्शन मिळविण्यासाठी नाकीनऊ
येतात, तेथेच भाजपच्या कार्यकर्त्यांकडे पन्नास हजार
इंजेक्शन येतात कोठून?’ असा सवाल युवक काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला. ‘ आज
सर्वसामान्यांवर ऑक्सिजनसाठी सोनं विकण्याची वेळ आली असून यासाठी केंद्रातील
भाजपचे सरकारच कारणीभूत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.
रेमडेसिविरच्या साठ हजार इंजेक्शनचा साठा लपवून ठेवलेल्या एका कंपनीच्या मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले. तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर त्याच्या सुटकेसाठी पोलिस स्टेशनला धावत आहे. ही इंजेक्शन त्यांनी राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी ठेवली होती. हे इंजेक्शन राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी कंपनीच्या मालकावर दबाव आणला जात होता. हे पोलिसांना कळाल्यावर पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आल्यावर भाजपचे नेते सुटकेसाठी तेथे धावत आले.
0 टिप्पण्या