Ticker

6/Breaking/ticker-posts

जेऊरला करोनाने पुन्हा घेरले; आज पासून ७ दिवस जनता कर्फ्यू

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नगर:-  नगर तालुक्यातील जेऊर येथे गेल्या महिन्यापासून कोरोनाने धुमाकूळ घातला असून रुग्णांची वाढती संख्या पाहता जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. जेऊर गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. आजमितिला येथे सुमारे ७० पेशंट विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आजतागायत जेऊर परिसरात सुमारे दोनशे रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता कोरोना ग्रामस्तरीय समितीने सात दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार दि.१७ ते शुक्रवार दि. २३ या कालावधीत गाव बंद राहणार आहे. किराणा दुकान व दूध डेअरी साठी सकाळी सहा ते आठ यावेळी परवानगी देण्यात आलेली आहे.

 गावामध्ये कोरोनाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी सर्व नागरिकांना जनता कर्फ्युत सहकार्य करावे तसेच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन ग्रामस्तरीय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या