Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोना रूग्णाची ससे होलपट ..! खरवंडी कासार येथील - घटना ..

 कोव्हीड सेटंर ला  जाण्यासाठी अँम्बुलन्सची वाट पहात करावा लागला झाडाखाली आराम 



लोकनेता न्यूज

  ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

खरवंडी कासार : -खरवंडी कासार प्राथमिक आरोग्य केद्रांमध्ये कोव्हीड ची तपासणी केल्यानतंर तपासणीत  कोरोना पॉझीटिव्ह आलेल्या  रुग्णाना कोव्हिड सेटंरला  जाण्यासाठी अँम्बुलन्सची वाट बघत   बसावे लागले .

पाथर्डी तालुक्याच्या पुर्व भागात व मराठवाड्याच्या सरहद्दी वर असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केद्रांमध्ये कोव्हिड ची चाचणी केली जात आहे मात्र येथे कोव्हीड  सेटंर नसल्याने येथे कोरोना पॉझीटिव्ह रूग्णाला पाथर्डी व मोहटादेवी येथिल कोव्हिड सेटंरला भरती व्हावे लागते खरवंडी कासार पासुन हे अंतर पचंविस किलो मिटर असुन तेथे जाण्यासाठी खाजगी वाहन उपलब्ध होत नाही तर शासकीय अँम्बुलन्स वेळेवर येत नसल्याने रुग्णाची हेळसांड होत आहे 



शुक्रवारी सकाळी कोव्हीडची तपासणी साठी दाखल झालेल्या रूग्णाची ११ वाजता त्यांची तपासणी झाली . त्यामध्ये सात व्यक्ती पॉझीटिव्ह आल्या त्यामध्ये या परिसरातील मोठ्या गावच्या सरपंचाचे पती ही होते त्यांना  कोव्हीड सेटंरला जाण्यासाठी  दुपारी ४ वाजे पर्यत ही  अँम्बुलन्स वाहन आले नव्हते त्यांना कोहीड सेटंरला घेऊन जाण्यासाठी वाहन न आल्याने त्यांना  अन्न पाणी ही मिळाले नाही विशेष म्हणजे आरोग्य केद्रांच्या मोळळ्या आवारात हे रूग्ण झाडाखाली झोपले व बसले होते याच मोकळया आवारात आरोग्य क्रेदांत येणाऱ्या इतर व्यक्ती पॉझीटिव्ह रुग्णाच्या सपंर्का मध्ये येतात  ही येतात  त्यामुळे येथे पॉझीटिव्ह निघालेल्या रुग्णाचे अँम्बुलन्स येई पर्यंत अलगीकरण करणे तो पर्यंत औषध गोळ्या पाणी यांची तात्पुरती व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्था मधुन होत आहे . 

खरवंडी कासार येथे कोव्हीड सेटंर व्हावे 

पाथर्डी पासुन खरवंडी कासार भालगाव मिडसागंवी हे अंतर जास्त असुण पॉझीटिव्ह रूग्णाचे पाथर्डी मोहटादेवी कोव्हीड सेटर ला जाण्यासाठी हाल होत आहे खरवंडी कासार येथे ही दररोज कोरोना रूग्णाचा आकडा वाढत आहे त्यामुळे खरवंडी कासार येथे कोव्हिड सेटंर सुरू करावे अशी मागणी संत  वामनभाऊ सेवाभावी सस्थेचे अध्यक्ष मिथुन डोगंरे यांनी केली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या