Ticker

6/Breaking/ticker-posts

नाथाभाऊ खडसेंच्या आवाजातील व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे एकच खळबळ

 






लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

जळगावः गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील वाकोद जवळील वडगाव येथील एका तरुणाने एकनाथ खडसे यांना केलेल्या मोबाईल कॉलची रेकार्डिंग व्हायरल झाली आहे. त्या खडसे यांच्या आवाजातील, 'आमदार काय करतोय गिरीश...? बायकांमागे फिरतोय नुसता...!' 'गिरीश फक्त पोरींचे फोन उचलतो' असे संवाद असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे व भाजप नेते आमदार गिरिश महाजन  यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहित आहे. या वादात आता एक नवी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. या व्हायरल रेकॉर्डिंगमध्ये खडसे हे आमदार गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील अर्थात जामनेर तालुक्यातील वडगावच्या तरुणाशी संवाद साधत आहेत. या संवादात खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर बोचऱ्या शब्दात केलेली टीका जिल्ह्यात चर्चेचा विषय झाली आहे.

वडगाव बुद्रुक गावात प्रचंड पाणी टंचाई आहे. हे गाव गिरीश महाजन यांच्या मतदार संघात येते. गावात पाणी नसल्याने गावातील एक तरुण थेट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेना फोन करून तक्रार करतानाचा संवाद व्हायरल झाला आहे. या संवादात जामनेर तालुक्यातील वडगाव बुद्रुकला पाणी नाही अशी तक्रार युवक करीत असताना खडसे यावर त्याला विचारतात की, कसं काय पाणी नाही तुझा आमदार कुठं मेला...का...? आमदार काय करतोय गिरीश... इकडे तिकडे बायकांमागे फिरतोय निस्ता...' आमदार फोन उचलत नाही, असं समोरील मुलगा सांगतांना खडसे पुढे म्हणतात... की  पोरींचाच फोन उचलतो. अशाप्रकारचा सवांद त्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये आहे.


नो कॉमेंट्स : खडसे
दरम्यान
, सोशल मीडियात व्हायरल होत असलेली ही ऑडिओ क्लीप चर्चेत आल्याने खळबळ उडाली आहे. या रेकार्डींग संदर्भात एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला या विषयावर जास्त बोलायचे नाहीय, अशी प्रतिक्रीया मटासोबत बोलतांना दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या