Ticker

6/Breaking/ticker-posts

खा.डॉ.सुजय विखे व आ.मोनिकाताई राजळे यांच्यात मतभेद नाहीत - अजय रक्ताटे

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

पाथर्डी :-भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉ.सुजय विखेपाटील यांचे तालुक्यातील दि 31 रोजीचे खासगी स्वरुपाचे कार्यक्रम  असल्याने या कार्यक्रमाचे निमंत्रण सर्व कार्यकर्ते यांना देण्यात आलेले नव्हते याच दिवशी आमदार मोनिकाताई राजळे यांचे देखील मतदार संघामध्ये नियोजित कार्यक्रम होते त्यामुळे दोन्ही नेत्याची भेट होऊ शकले नाहीत याबाबत होणा-या चर्चा हया चुकीच्या असल्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारीणी सदस्य, अजय रक्ताटे, यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात दिली आहे.

खा.डॉ.सुजय विखेपाटील यांचा तालुक्यातील दौरा खासगी स्वरुपाचा व अचानक ठरलेला असल्यामुळे तसेच आमदार मोनिकाताई राजळे यांचे नियोजित कार्यक्रम याच दिवसी सुरु होते  कार्यक्रम संपल्यानंतर खा.डॉ.सुजय विखे हे मुंबई येथे बैठकीनिमित्ताने जाणे गरजेचे असल्याने या दोन्ही नेत्यांची या दिवसी भेट झाली नाही मात्र याबाबत  समाजमाध्यमांमध्ये वेगवेगळयाप्रकारचे चर्चा सुरु असुन, दोन्ही नेत्यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा विरोधकांकडुन केल्याजात आहेत, अशाप्रकारचा कुठलाही प्रकार नसुन  खासदार डॉ. सुजय विखे पाटील तसेच आमदार मोनिकाताई राजळे हे यांच्यामध्ये कुठल्याहीप्रकारचे मतभेद नाहीत, अशी माहिती  खासदार विखे समर्थक अजय रक्ताटे यांनी  दिलेल्या प्रसिध्दी पत्रकामध्ये दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या