Ticker

6/Breaking/ticker-posts

हवेतून करोना पसरतो म्हणून घाबरू नका; तज्ज्ञांनी सांगितले, 'असा' करा बचाव

 


लोकनेता न्यूज                  

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 वॉशिंग्टन: जगभरात करोनाचे थैमान सुरू आहे. अनेक देशांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. करोनाचा विषाणू हवेतून फैलावत असल्याचे 'द लँसेट' या वैद्यकीय नियतकालिकेत प्रकाशित करण्यात आले आहे. त्यानंतर अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले. मात्र, मॅरिलँड स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. फहीम युनूस यांनी चिंता करण्याची अथवा अनावश्यक भीती बाळगण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.

डॉ. फहीम यांनी सांगितले की, कोविडचा विषाणू लाळेतील तुषारकण हवेत असल्यामुळे फैलावतो. करोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी कापडी मास्क वापर बंद करण्याची आवश्यकता आहे. दोन N95 किंवा KN95 मास्क खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. एका मास्क एकच दिवस वापरावा. वापरलेला मास्क पेपर बॅगेत भरावा आणि दुसऱ्या मास्कचा वापर करावा. दर २४ तासानंतर मास्क बदलून वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला.

डॉ. फहीम यांनी सांगितले की, हवेतून विषाणूचा संसर्ग होतो म्हणजे हवा संसर्गबाधित आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. हवेत विषाणू असू शकतो, इमारतींमध्ये आणखी धोका निर्माण होऊ शकतो.


डॉक्टर फहीम करोना महासाथीच्या सुरुवातीपासून ट्विटरवर लोकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉ. फहीम यांनी सांगितले की, काही बाबींचे पालन केल्यास घरीच राहून संसर्गावर मात करता येऊ शकते. घरातच योग्य पद्धतीने राहिल्यास ८० ते ९० टक्के जण करोनावर मात करू शकतात.

दररोज तापमान तपासणे, श्वासाचा वेग, हृदयाचे ठोके मोजणे आणि रक्तदाब मोजणे आवश्यक आहे. अनेक स्मार्टफोनमध्ये पल्स ऑग्जिमेंट्री अॅप असते. त्यामध्ये ऑग्ज ९० पेक्षा कमी असल्यास अथवा रक्तदाब ९० सिस्टोलिकपेक्षा खाली आल्यास तर डॉक्टरांशी संपर्क साधवा. उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेहाचा त्रास असलेल्या ६०-६५ वर्षांच्या व्यक्तिंना करोनाचा अधिक धोका आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या